उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर 2024 चे केले उद्घाटन
एनसीसी छात्र हे देशातील तरुणांपुढील आदर्श: उपराष्ट्रपती
Posted On:
05 JAN 2024 2:56PM by PIB Mumbai
युवकांच्या उर्जेला सकारात्मकतेचा मार्ग दाखवून युवा विकास आणि देशाच्या प्रगतीच्या नव्या युगाची सुरुवात केल्याबद्दल, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) प्रशंसा केली आहे. एनसीसी कॅडेट्स हे भारताच्या उदयाचे महत्वाचे भागीदार असून, देशाच्या युवकांपुढील आदर्श आहेत, असे ते म्हणाले.
नवी दिल्ली येथे आज एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर-2024 च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, धनखड यांनी ‘कॅडेट्सची ऊर्जा चिरंतन आणि चिरस्थायी आहे’, हे अधोरेखित करत, आपल्या एनसीसी कॅडेट असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.
कॅडेट्सनी आपल्या प्रतिष्ठेचा सर्वोत्तम दर्जा कायम राखावा, असे आवाहन करून, भारताला 2047 पर्यंत खऱ्या अर्थाने विकसित देश आणि विश्व गुरु करण्यासाठी त्यांनी उत्साह, शौर्य आणि समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन केले. “शिस्त आणि देशभक्ती हे गुण तुमच्या हृदयात सदैव वसत राहायला हवेत, हीच आपल्या मातृभूमीला सर्वात मोठी आदरांजली आहे,” ते म्हणाले.
“एनसीसी, राष्ट्रीय जागरूकता मोहिमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमचा नैसर्गिक विकास सुनिश्चित करते,” असे त्यांनी नमूद केले.
एनसीसी मधील महिलांच्या वाढत्या सहभागाची प्रशंसा करत धनखड म्हणाले की, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी, महिला छात्र दोन विशेष तुकड्यांमध्ये महिला बँड पथकांसह कर्तव्य पथावर अभिमानाने संचलन करतील.
वाचा:
Read:-> Text of the Vice-President’s address at the NCC Republic Day Camp 2024 (Excerpts)
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993567)
Visitor Counter : 108