रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेकडून डिसेंबर 2023 पर्यंत 1154.67 मेट्रिक टन मालवाहतूक

Posted On: 04 JAN 2024 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2024

 

भारतीय रेल्वेकडून एप्रिल-डिसेंबर 2023 या कालावधीत 1154.67 मेट्रिक टन एकूण मालवाहतूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 1109.38 मेट्रिक टन मालवाहतूक झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 45.28 मेट्रिक टन वाढ झाली आहे. रेल्वेने 125106.2 कोटी रुपये महसूल मिळवला असून गेल्या वर्षी  120479.3 कोटी रुपये प्राप्त केले होते. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या महसुलाच्या  तुलनेत यंदा 4626.92 कोटी रुपये वाढ झाली आहे.

डिसेंबर 2023 मध्ये 138.99 मेट्रिक टन प्रारंभिक मालवाहतूक साध्य झाली असून डिसेंबर 2022 मध्ये ती  130.66 मेट्रिक टन होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा  6.37% सुधारणा झाली आहे. मालवाहतुकीतून डिसेंबर 2023 मध्ये 15097.61कोटी रुपये महसूल प्राप्त झाला असून डिसेंबर 2022 मध्ये 14574.25 कोटी रुपये प्राप्त केले आहेत. यात गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 3.59% सुधारणा आहे.

''हंग्री फॉर कार्गो'' (मालवाहतुकीची क्षुधा ) हा मंत्र अनुसरत भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी   तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरण सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि सुगम धोरण निर्मितीद्वारे समर्थित  व्यवसाय विकास युनिट्सच्या कार्यामुळे रेल्वेला हे  महत्त्वपूर्ण यश साध्य करण्यात साहाय्य मिळाले. 

 

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1993182) Visitor Counter : 94


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi