गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय गृह मंत्रालयाने 'तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू आणि काश्मीर (TeH)' ला 'बेकायदेशीर संघटना' म्हणून केले घोषित

Posted On: 31 DEC 2023 1:46PM by PIB Mumbai

 

भारत सरकारने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) 1967 च्या कलम 3 (1) अंतर्गत 'तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू आणि काश्मीर (TeH)' ला 'बेकायदेशीर संघटना' म्हणून घोषित केले आहे.

जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी आणि इस्लामिक राजवट स्थापन करण्यासाठी ही संघटना बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी  आहे.  हा गट जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी भारतविरोधी प्रचार आणि सतत दहशतवादी कारवाया करत असल्याचे आढळत आहेअसे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘X’ वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य-सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत, भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असलेली कोणतीही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात ताबडतोब कारवाई केली जाईल, असेही शहा यांनी म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राजवट  स्थापन करणे हे तेहरीक-ए-हुरियत, जम्मू आणि काश्मीर (TeH) चे उद्दिष्ट आहे.  ही संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी दहशतवाद आणि भारतविरोधी प्रचारात सहभागी आहे. या संघटनेची अशी कृत्ये भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला घातक आहेत.  या संघटनेविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, शस्त्रास्त्र कायदा, आरपीसी आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1991959) Visitor Counter : 142