गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
देशभरातील 57 लाखांहून अधिक फेरीवाल्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला : केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 45% महिला तर 72% उपेक्षित वर्गातील लाभार्थी : हरदीप सिंह पुरी
Posted On:
29 DEC 2023 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2023
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय स्ट्रीट फूड फेस्टिव्हल 2023 चे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी 28 राज्यांतील रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या उत्साही समुदायाला शुभेच्छा दिल्या. भारतीय राष्ट्रीय फेरीवाला संघटने (NASVI) तर्फे 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा स्ट्रीट फूड महोत्सव जआयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी फेरीवाल्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री फेरीवाले आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कोविड महामारीदरम्यान सुरू करण्यात आलेली पीएम - स्वनिधी योजना अनेकांसाठी आशेचा किरण बनली आहे, असेही ते म्हणाले.
या योजनेचा 57.83 लाख फेरीवाल्यांना लाभ झाला आहे, असे पुरी यांनी योजनेच्या यशाचा संदर्भ देताना सांगितले. या योजनेअंतर्गत 80.77 लाख जणांना कर्ज मंजूर करण्यात आले असून सूमारे 10,058 कोटी रुपये 76.22 लाख जणांना कर्जाच्या रुपात वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेंतर्गत कर्ज मिळालेल्या महिला फेरीवाल्यांची टक्केवारी सर्व वितरित कर्जाच्या सुमारे 45% (25.78 लाख) इतकी आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे सुमारे 72% लाभार्थी उपेक्षित वर्गातील आहेत, असेही त्यांनी नमूद केले. भारताच्या स्वच्छता चळवळीच्या अनुषंगाने भ पहिल्या ‘शून्य कचरा स्ट्रीट फूड महोत्सवाची’ संकल्पना मांडल्याबद्दल पुरी यांनी भारतीय राष्ट्रीय फेरीवाला संघटनेचे (NASVI) अभिनंदन केले.
S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1991641)
Visitor Counter : 115