भूविज्ञान मंत्रालय

भारत हवामान अंदाज आणि हवामान अभ्यासात अग्रणी  भूमिका घेईल -  किरेन रिजिजू 


भारतीय हवामानशास्त्र विभागाने 150 वर्ष  बजावलेल्या सेवेनिमित्त केंद्रीय भूविज्ञान मंत्र्यानी बोधचिन्हाचे केले अनावरण

Posted On: 26 DEC 2023 7:09PM by PIB Mumbai

 

भारत हवामान अंदाज आणि हवामान अभ्यासात अग्रणी  भूमिका घेईल असे  किरेन रिजिजू  यांनी आज सांगितले.

पृथ्वी विज्ञान विभागाकडे  अल्पकालीन योजना यापूर्वीच आखलेली आहे आणि आता विभाग अमृतकाळासाठी   2047 पर्यंत   आत्मनिर्भर भारताची  योजना तयार करत आहे,",असे त्यांनी सांगितले.  देशासाठी  भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या  150 वर्षांच्या सेवेनिमित्त  बोधचिन्हाचे  अनावरण  केल्यानंतर   रिजिजू उपस्थितांना संबोधित करत होते.

हवामान बदलाच्या मुद्द्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वर्षभराच्या उत्सवांमध्ये शालेय मुलांना एकत्रित करण्याचे आवाहन रिजिजू यांनी  भारतीय हवामानशास्त्र विभागाला केले. हवामान बदल आणि तापमान वाढ  या जागतिक चिंता आहेत. अचानक वाढणारे प्रदूषण   तसेच  ढगफुटी आणि अतिवृष्टी यासारखे तीव्र  हवामान पृथ्वीवरील व्यापक हवामान बदलाचा परिणाम आहे,” असे सांगत   आपण जागरूकता वाढवण्याची गरज आहे यासाठी सर्व व्यक्तींना एकत्र येऊन काम करावे लागेल, असे ते म्हणाले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे बोधचिन्ह   1875 पासून विभागाच्या उल्लेखनीय प्रवासाचे प्रतीक आहे:

•   हे बोधचिन्ह  भारतीय हवामानशास्त्र विभागाद्वारे देशासाठी समर्पित 150 वर्षे सेवा दर्शवते.

•   हे हवामान-सज्ज   आणि हवामान-स्मार्ट राष्ट्रासाठी हवामान आणि हवामान पाठबळ  प्रदान करण्यात विभागाची निरंतर  प्रगती दर्शवते.

•   हे "वसुधैव कुटुंबकम" च्या भावनेने जागतिक कल्याणामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाची भूमिका अधोरेखित करते.

•   हे बोधचिन्ह  परावलंबी  भारताकडून आत्मनिर्भर भारताकडे झालेल्या संक्रमणाची साक्ष आहे.

•   या बोधचिन्हामध्ये  कोरलेल्या  "आदित्यत् जयते वृष्टी " सह प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत भारतीय हवामानशास्त्राचे सातत्य दर्शवते.

•   भारताच्या  तिरंग्याच्या संकल्पनेशी  असलेले बोधचिन्हाचे साम्य हे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सेवांचा  राष्ट्रीय दृष्टीकोन आणि ध्येयाशी संरेखन सुनिश्चित करते.

***

S.Bedekar/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1990609) Visitor Counter : 93


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil