रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एनएचआयआयडीसीएल (राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड) ने जाहीर केलेल्या वित्तीय निकालात, कार्यान्वित करण्यात आलेल्या कामांच्या मूल्यांची 2021-22 मध्ये असलेली किंमत, 14953 कोटी रुपयांवरुन, 2022-23 या वर्षात, 19309 कोटी रुपयांपर्यंत वाढली
Posted On:
23 DEC 2023 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 डिसेंबर 2023
राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, (NHIDCL) या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील आस्थापनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक, 22 डिसेंबर 2023 रोजी झाली. या बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या वित्तीय निकालात, संस्थेच्या अत्यंत उमद्या कामगिरीचे चित्र दिसत आहे. कार्यान्वित करण्यात आलेल्या, कामांचे मूल्य, वर्ष 2021-22 मध्ये, 14953 कोटी रुपये इतके होते, मात्र, 2022-23 मध्ये त्यात, 19309 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
42.61% ची मजबूत वाढ दर्शवित, आर्थिक वर्ष 2021-22 मधील 332.53 कोटी रुपयांवरून महसूल, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 474.22 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. करानंतरच्या नफ्यात देखील, 98.34% ची लक्षणीय सुधारणा झाली असून, आर्थिक वर्ष 2021-22 मधील 113.29 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 224.70 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, प्रति समभाग कमाई (ईपीएस) मध्ये आर्थिक वर्ष 2021-22 मधील 11.00 रुपयांवरून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ₹ 21.82 पर्यंत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
त्यासोबतच, लाभांश वितरणातही आर्थिक वर्ष 2020-21 च्या 34.00 कोटी रुपयांच्या तुलनेत, आर्थिक वर्ष, 2022-23 मध्ये, 67.47 कोटी रुपयांपर्यंत, म्हणजेच, प्रती समभाग 6 रुपये 55 पैसे इतकी, ज्याचे दर्शनी मूल्य, 10 रुपये इतके आहे, वाढ झाली आहे. हा लाभांश आपल्या भागधारकांप्रति कंपनीची वचनबद्धता दर्शवणारा आहे. तसेच तो, ईशान्य प्रदेश, लडाख, जम्मू आणि काश्मीर अशा भागांवर विशेष भर देऊन रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासात शाश्वत यशाच्या मार्गावर चालण्यासाठी, तर्कशुद्ध आर्थिक व्यवस्थापन करण्याचे कंपनीचे कौशल्य अधोरेखित करतो.
M.Pange/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1989894)
Visitor Counter : 93