गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
स्वच्छ शौचालय स्पर्धेतील नामांकनामधून सर्वोत्तम सार्वजनिक शौचालयांच्या प्रारूपांचे सादरीकरण
Posted On:
22 DEC 2023 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 22 डिसेंबर 2023
स्वच्छ शौचालय स्पर्धेत नागरिक, शहरी स्थानिक संस्था आणि राज्य मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून केवळ स्वच्छ शौचालयांच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांची स्वच्छता आणि देखभाल याकरता प्रत्यक्ष स्वरूपातील उपाययोजना करत आहेत. स्वच्छ शौचालय स्पर्धेअंतर्गत सर्वोत्कृष्ट आदर्श सार्वजनिक शौचालये निवडण्यासाठी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने, सरकारला सेवा देणाऱ्या पूर्णतः किंवा अंशतः सरकारी संस्था, खाजगी ऑपरेटर, बिगर शासकीय संस्था, स्वयंसहायता गट, सरकारचे संबंधित विभाग आणि मंत्रालय यांच्याकडून नामांकन मागवली आहेत. कार्यक्षमतेचे उदाहरण मांडणारे, सुलभ, स्वच्छ, पर्यावरणास अनुकूल आणि सुरक्षित शौचालये या 'FACES' च्या मापदंडावर नामांकन आधारित आहेत.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर, जागतिक शौचालय दिन ते 25 डिसेंबर, सुशासन दिन या कालावधीतील 5 आठवड्यांच्या स्वच्छ शौचालय अभियानाला आरंभ झाला. सार्वजनिक शौचालयांमधील स्वच्छता, सफाई, देखभाल, कार्यक्षमता, लोकांपर्यंत पोहोच, सुरक्षितता आणि इतर सुविधांचे मूल्यांकन करण्यासाठी, एक 'शौचालय ग्रेडिंग' प्रणाली तयार केली गेली आहे आणि शहरी स्थानिक संस्थांमधील विविध बचत गटांद्वारे त्याची सुविधा दिली जात आहे. स्वच्छ भारत अभियान - शहरी आणि दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या समन्वय साधून सार्वजनिक शौचालयांच्या श्रेणीसाठी संबंधित वॉर्ड आणि भागातील स्वयंसहायता गटांना टॅग केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या बचत गटांना प्रतवारी आणि मापदंडांच्या विविध तपशीलांवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. हा उपक्रम 25 डिसेंबर 2023 रोजी संपेल.
सर्व शहरे आणि स्थानिक संस्थांनी शौचालये स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने उत्तम गुणवत्तापूर्ण स्वच्छता सेवा देण्यासाठी नवीन संशोधन आणि स्मार्ट उपाययोजनांचा अवलंब केला आहे. याशिवाय स्वच्छता मोहिम आणि शौचालयांच्या नूतनीकरणा बरोबरच, काही अपवादात्मक स्मार्ट शौचालय मॉडेल्स आणि सर्वोत्तम पद्धती आपल्या कामातून इतर स्थानिक संस्थांना प्रेरणा देत आहेत.
उत्तर प्रदेश येथील गोरखपूरमध्ये, स्वयंसहायता गट राप्ती या नावाने प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत. तर लुधियानाने ऊर्जा-कार्यक्षम सार्वजनिक शौचालयांसाठी सौर संयंत्र बसवले आहे. नवी मुंबईचे आकांक्षी शौचालय मॉडेल पुनर्नवीनीकरण केलेल्या साहित्यापासून बनवले गेले आहे आणि सध्याच्या सर्वसमावेशक शहर परिचालन आणि देखरेख योजनेशी संलंग्न बिगर शासकीय संस्थांच्या माध्यमातून परिचालन आणि देखरेख केली जात आहे. या शौचालयांमध्ये पुनर्वापर आणि प्रक्रिया केलेले पाणी वापरले जाईल.
स्वच्छ शौचालय स्पर्धेसाठी नामांकन अर्ज https://ctc.sbmurban.org/ वर उपलब्ध आहेत आणि अर्ज भरण्याची मुदत 23 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. नामांकन पूर्ण झाल्यावर, तज्ञ आणि अधिकार्यांची एक स्वतंत्र ज्युरी नामांकित शौचालयांचे मूल्यांकन करेल आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने निवडलेल्या सर्वोत्तम मॉडेल शौचालयांना 'स्वच्छ भारत सार्वजनिक शौचालय' म्हणून सन्मानित केले जाईल तसेच त्यांनी राबवलेले स्वच्छता विषयक उपक्रम इतरांनी देखील शिकावेत आणि त्यांचे अनुकरण करावे या उद्देशाने मानदंड म्हणून ओळखले जाईल.
स्वयंसहायता गट सामुदायिक शौचालय (CT) आणि सार्वजनिक शौचालय (PT) ची प्रतवारी करत आहेत आणि कार्यक्षमता आणि सुलभतेवर आधारित शौचालयांचे मूल्यांकन करत आहेत. सामुदायिक शौचालय आणि सार्वजनिक शौचालयांची श्रेणी 25 डिसेंबर 2023 पर्यंत ठरवली जाईल.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1989699)
Visitor Counter : 90