युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेलो इंडिया योजना आणि राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (एन. एस. डी. एफ.) अंतर्गत 341 क्रीडा पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी
36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या 679 जिल्ह्यांमध्ये 1000 खेलो इंडिया केंद्रे आणि 32 खेलो इंडिया राज्य केंद्रे अधिसूचित
Posted On:
21 DEC 2023 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2023
देशातील तरुणांचे क्रीडाविषयक हित जपण्यासाठी, या मंत्रालयाने आतापर्यंत खेलो इंडिया योजना आणि राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (एन. एस. डी. एफ.) अंतर्गत देशभरातील 341 क्रीडा पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. याव्यतिरिक्त, खेलो इंडिया योजनेंतर्गत 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या 679 जिल्ह्यांमधील 1000 खेलो इंडिया केंद्रे आणि 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 32 खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रे अधिसूचित करण्यात आली आहेत.
याशिवाय, 23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 296 क्रीडा संस्थांदेखील मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज राज्यसभेत अजय प्रताप सिंग यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Bedekar/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1989310)