नागरी उड्डाण मंत्रालय
देशातल्या 13 विमानतळांवर 'डीजी यात्रा' कार्यान्वित
इतर विमानतळांचा टप्प्याटप्प्याने केला जाणार समावेश
Posted On:
21 DEC 2023 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2023
विमानतळांवरील सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी सरकार सुरक्षा उपकरणे, सुरक्षा मनुष्यबळ वाढवून आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सातत्याने प्रयत्न करत आहे. चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बायोमेट्रिक-आधारित प्रवासाद्वारे विमानतळांवर प्रवाशांना अखंड आणि त्रास-मुक्त अनुभव देणारी डिजी यात्रा देखील 13 विमानतळांवर कार्यान्वित केली आहे आणि भविष्यात इतर विमानतळांवर ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल (डॉ.) व्ही. के. सिंग (निवृत्त) यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Bedekar/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1989293)
Visitor Counter : 87