युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर


राष्ट्रपतींच्या हस्ते 09 जानेवारी 2024 रोजी दिले जाणार पुरस्कार

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक साई राज यांना देण्यात येणार

वर्ष 2023 मध्ये खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार

Posted On: 20 DEC 2023 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2023 

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर केले. राष्ट्रपती भवन येथे  9 जानेवारी 2024 (मंगळवार) रोजी सकाळी 11. 00 वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते  हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 बॅडमिंटनपटू चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक साई राज यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील नैपुण्याचा सन्मान करण्यासाठी प्रदान केले जातात. 

‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ खेळाडूला  मागील चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.

खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन  पुरस्कार’ खेळाडूला मागील चार वर्षांच्या कालावधीतील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि  शिस्तपालन यासाठी  दिला जातो.

‘उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार’ क्रीडाप्रशिक्षणात सातत्याने  उत्कृष्ट व  गुणवत्तापूर्ण  कार्य करणाऱ्या  आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सक्षम करणाऱ्या प्रशिक्षकांना दिला जातो. 

क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा क्षेत्रात आपल्या कामगिरीने  योगदान देणाऱ्या  आणि निवृत्तीनंतरही खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत योगदान देणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो. यंदा या पुरस्कारांसाठी मंजुषा कंवर, विनीत कुमार शर्मा आणि कविता सेल्वराज यांची निवड करण्यात आली आहे. 

वर्ष 2023 मध्ये खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यात तिरंदाज ओजस देवतळेचा समावेश आहे. 

उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये मलखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचा समावेश आहे. 

आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सर्वांगीण उत्कृष्ट  कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) चषक दिला जातो. यंदा अमृतसरचे गुरू नानक देव विद्यापीठ या चषकाचे मानकरी ठरले आहे. 

अर्ज ऑनलाइन मागवण्यात आले होते आणि खेळाडू/प्रशिक्षक/संस्था यांना समर्पित ऑनलाइन पोर्टलद्वारे स्व-अर्ज करण्याची परवानगी होती. यावर्षी या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज/नामांकने  प्राप्त झाली  होती. सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर  यांच्या अध्यक्षतेखालील निवड  समितीमध्ये  प्रख्यात खेळाडू, क्रीडा पत्रकारितेचा अनुभव असलेल्या व्यक्ती आणि क्रीडा प्रशासक यांचा समावेश होता. 

समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर, सरकारने खालील  खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे:

(i) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023

S. No.

Name of the sportsperson*

Discipline

1.

Shri Chirag Chandrashekhar Shetty

Badminton

2.

Shri Rankireddy Satwik Sai Raj

Badminton

 * दोन्ही क्रीडापटूंना त्यांच्या समान सांघिक कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

 

(ii) वर्ष 2023 मध्ये  खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार 

S. No.

Name of the sportsperson

Discipline

  1.  

Shri Ojas Pravin Deotale

Archery

  1.  

Ms Aditi Gopichand Swami

Archery

  1.  

Shri Sreeshankar M

Athletics

  1.  

Ms Parul Chaudhary

Athletics

  1.  

Shri Mohameed Hussamuddin

Boxing

  1.  

Ms R Vaishali

Chess

  1.  

Shri Mohammed Shami

Cricket

  1.  

Shri Anush Agarwalla

Equestrian

  1.  

Ms Divyakriti Singh

Equestrian Dressage

  1.  

Ms Diksha Dagar

Golf

  1.  

Shri Krishan Bahadur Pathak

Hockey

  1.  

Ms Pukhrambam Sushila Chanu

Hockey

  1.  

Shri Pawan Kumar

Kabaddi

  1.  

Ms Ritu Negi

Kabaddi

  1.  

Ms Nasreen

Kho-Kho

  1.  

Ms Pinki

Lawn Bowls

  1.  

Shri Aishwary Pratap Singh Tomar

Shooting

  1.  

Ms Esha Singh

Shooting

  1.  

Shri Harinder Pal Singh Sandhu

Squash

  1.  

Ms Ayhika Mukherjee

Table Tennis

  1.  

Shri Sunil Kumar

Wrestling

  1.  

Ms Antim

Wrestling

  1.  

Ms Naorem Roshibina Devi

Wushu

  1.  

Ms Sheetal Devi

Para Archery

  1.  

Shri Illuri Ajay Kumar Reddy

Blind Cricket

  1.  

Ms Prachi Yadav

Para Canoeing

 

(iii)वर्ष  2023 मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

अ )  नियमित श्रेणी:

S. No.

Name of the Coach

Discipline

  1.  

Shri Lalit Kumar

Wrestling

  1.  

Shri R. B. Ramesh

Chess

  1.  

Shri Mahaveer Prasad Saini

Para Athletics

  1.  

Shri Shivendra Singh

Hockey

  1.  

Shri Ganesh Prabhakar Devrukhkar

Mallakhamb

 

ब )  जीवनगौरव :

S.No.

Name of the Coach

Discipline

  1.  

Shri Jaskirat Singh Grewal

Golf

  1.  

Shri Bhaskaran E

Kabaddi

  1.  

Shri Jayanta Kumar Pushilal

Table Tennis

 

(iv) वर्ष  2023 ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार :

S. No.

Name of the sportsperson

Discipline

  1.  

Ms Manjusha Kanwar

Badminton

  1.  

Shri Vineet Kumar Sharma

Hockey

  1.  

Ms Kavitha Selvaraj

Kabaddi

 

(v) मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) चषक  2023:

1.

Guru Nanak Dev University, Amritsar

Overall winner university

2.

Lovely Professional University, Punjab

1st runner up University

3.

Kurukshetra University, Kurukshetra

2nd runner up University

 

 

* * *

S.Bedekar/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1988835) Visitor Counter : 457