अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सकल प्रत्यक्ष कर संकलनात 17.01% वाढ
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 20.66% पेक्षा अधिक वाढ
आर्थिक वर्ष 2023-24 साठी अग्रिम कर संकलन 6,25,249 कोटी रुपये झाले असून त्यात 19.94% टक्के वाढ
चालू आर्थिक वर्षात, सुमारे 2,25,251 कोटी रुपयांचे परतावे जारी
Posted On:
18 DEC 2023 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2023
2023-24 या आर्थिक वर्षासाठी (17 डिसेंबर 2023 पर्यंत) तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलन 13,70,388 कोटी रुपये इतके झाले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, याच कालावधीत 11,35,754 कोटी रुपये संकलन झाले होते, ज्यात 20.66% वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष करांच्या एकूण संकलनाची प्राथमिक आकडेवारी (परताव्यासाठी समायोजन करण्यापूर्वी) 15,95,639 कोटी रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ही रक्कम 13,63,649 कोटी रुपये होती. यंदा, आर्थिक वर्ष 2022-23 च्या संकलनाच्या तुलनेत 17.01% वाढ झाली आहे.
15,95,639 कोटी रुपयांच्या समग्र कर संकलनात, 7,90,049 कोटी रुपये कॉर्पोरेट कर, 8,02,902 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स सह वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे. किरकोळ संकलनात, 6,25,249 कोटी रुपयांचा अग्रिम कर समाविष्ट आहे. तर, 7,70,606 कोटी रुपयांचा उद्गम कर समाविष्ट आहे ; 1,48,677 कोटी रुपये स्वयं-मूल्यांकन कर; 36, 651 कोटी रुपये नियमित मूल्यांकन कर आणि 14, 455 कोटी रुपये इतर किरकोळ कर संकलित झाला आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 साठीच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, 6,25,249 कोटी रुपये अग्रिम कर संकलित झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम , 5,21,302 कोटी रुपये इतकी होती, ज्यात यंदा 19.94% ची वाढ झाली आहे. या 6,25,249 कोटी रुपयांच्या अग्रिम करांमधे, 4,81,840 कोटी रुपये कॉर्पोरेट कर आणि 1,43,404 कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे.
17 डिसेंबरपर्यंत, 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचे, 2,25,251 कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले आहेत.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1987971)