गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधील सानंद येथे विकसित भारत संकल्प यात्रेला केले संबोधित
Posted On:
16 DEC 2023 6:46PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमध्ये सानंद येथे विकसित भारत संकल्प यात्रेला संबोधित केले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे वर्ष 2047 मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची शतकपूर्ती होईल तेव्हा भारत संपूर्णपणे विकसित झालेला असेल यासाठीची शपथ घेण्याचा प्रवास आहे. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत देशातील प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय बदल घडून आले आहेत.
ज्या हुतात्म्यांनी आपल्या देशासाठी सर्वोच्च त्याग केला त्यांच्या स्वप्नातील भारताच्या उभारणीची वेळ आता आली आहे असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री म्हणाले की जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा देशात ज्याच्याकडे गॅस सिलेंडर, शौचालय, अन्न, घरात वीजजोडणी नसेल असा एकही माणूस शिल्लक नसावा, कोणीही निरक्षर राहू नये. अशा प्रकारच्या विकसित भारताची उभारणी करण्यास मदत करण्याची प्रतिज्ञा करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पंतप्रधानांनी देशात 2 कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते म्हणाले की एकदा ही योजना देशाच्या प्रत्येक गावामध्ये यशस्वीपणे पोहोचली की भारतात खऱ्या अर्थाने बदल घडून येईल.पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये शांतता, विकास, समृद्धी आणि गरीबात गरीब व्यक्तीला स्वावलंबी करण्याची जी परंपरा निर्माण केली तीच परंपरा विकसित भारत यात्रा पुढे नेईल असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1987255)
Visitor Counter : 126