सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अनुसूचित जाती आणि इतरांसाठीच्या दहावी-पूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, 2023-24 या आर्थिक वर्षात 7.38 लाख लाभार्थ्यांना केन्द्राच्या हिश्यातून 157.75 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जारी
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतरच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात 13.56 लाख लाभार्थ्यांना केन्द्राच्या हिश्यातून 1623.42 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जारी
Posted On:
14 DEC 2023 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतरची शिष्यवृत्ती योजना (पी. एम. एस.-एस. सी.) ही ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ भारतातील अभ्यासासाठी केंद्र पुरस्कृत योजना आहे.
अनुसूचित जाती आणि इतरांसाठीच्या दहावी-पूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या आणि अनुसूचित जातींसाठीच्या दहावी नंतरच्या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात, आर्थिक वर्ष 2023-24 च्या बाबत कामगिरी पुढीलप्रमाणे आहे:
- अनुसूचित जाती आणि इतरांसाठीच्या दहावी-पूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, 2023-24 या आर्थिक वर्षात 7.38 लाख लाभार्थ्यांना केन्द्राच्या हिश्यातून त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात 157.75 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जारी करण्यात आले आहेत.
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतरच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात 13.56 लाख लाभार्थ्यांना केन्द्राच्या हिश्यातून त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात 1623.42 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जारी करण्यात आले आहेत.
* * *
S.Kakade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986436)
Visitor Counter : 168