संरक्षण मंत्रालय

गुणवत्ता हमी महासंचालनालयाने (डी. जी. क्यू. ए.) 'वेळेत दर्जेदार उपकरणे' या विषयावर वडोदरा येथे केले पश्चिम क्षेत्र संरक्षण उद्योग परिषदेचे आयोजन

Posted On: 14 DEC 2023 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

 

संरक्षण मंत्रालयाच्या, संरक्षण उत्पादन विभागाच्या अखत्यारीतील गुणवत्ता हमी महासंचालनालयाने (डी. जी. क्यू. ए.) 'वेळेत दर्जेदार उपकरणे' या संकल्पनेवर आधारित, पश्चिम क्षेत्र संरक्षण उद्योग परिषदेचे वडोदरा येथे 14 डिसेंबर 2023 रोजी आयोजन केले होते. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील 'व्यवसाय सुलभता' आणि 'मेक इन इंडिया' या केंद्र  सरकारच्या ध्येयदृष्टीच्या अनुषंगाने, संरक्षण उत्पादन आणि गुणवत्ता हमी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे  नवीन उपक्रम विविध घटकांना या परिषदेत समजावून सांगण्यात आली. डी. जी. क्यू. ए. चे महासंचालक लेफ्टनंट जनरल आर. एस. रीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण उद्योग परिषदेला अतिरिक्त सचिव (संरक्षण उत्पादन) टी. नटराजन यांनी मार्गदर्शन केले.

'ग्रीन चॅनेल' आणि 'सेल्फ सर्टिफिकेशन', स्वयं प्रमाणन योजनांनी संरक्षण उत्पादकांना अधिक स्वायत्तता दिली आहे. याव्यतिरिक्त, 'रिमोट क्यू. ए. इन्स्पेक्शन', संरक्षण निर्यात प्रोत्साहन योजना आणि संरक्षण चाचणी आणि पायाभूत सुविधा योजनेचा उद्देश स्वदेशी उत्पादनाला चालना देणे हा आहे, असे टी नटराजन आपल्या भाषणात म्हणाले. या योजनांमुळे भारतीय संरक्षण उत्पादकांकडून महत्त्वपूर्ण संरक्षण उपकरणांचे जलद वितरण शक्य होईल", असे ते म्हणाले.

यावेळी एल अँड टी, मुंबईला ग्रीन चॅनेल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संरक्षण उद्योगांचे प्रतिनिधी, नौदल क्यू. ए. संघटना आणि वडोदरा येथील भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान क्यू. ए. वरील तांत्रिक प्रबंधांच्या संकलनाचेही प्रकाशन करण्यात आले.

 

* * *

S.Kakade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1986264) Visitor Counter : 38