युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये चमक दाखवणाऱ्या प्रणव सुरमा याने खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये क्लब थ्रो मध्ये केली विक्रमी कामगिरी


महाराष्ट्राच्या स्वरुप उन्हाळकरने 10 मीटर एयर रायफलमध्ये एसएच1 श्रेणीत पटकावले सुवर्णपदक

Posted On: 13 DEC 2023 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2023

 

हरयाणाच्या प्रणव सुरमा याने आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धांमधील आपल्या कामगिरीला आणखी उंचावत आज पुरुषांच्या क्लब थ्रो मध्ये एफ51 श्रेणीत सुवर्णपदक पटकावले. त्याची कामगिरी हेच खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धांमधील आजच्या दिवसाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. सुरमाने 33.54 मीटर अंतरावर  क्लब थ्रो केला आणि हांगझू येथे सुवर्णपदक पटकावताना केलेल्या 30.01 मीटरच्या कामगिरीला मागे टाकले. याबरोबरच त्याने भारताच्या धरमबीरचा 31.09 मीटरचा आशियायी विक्रम देखील मोडीत काढला. या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या राम रतन सिंह याने 25.43 मीटर अंतरासह रौप्य आणि तामिळनाडूच्या अलेक्झांडरने 25.28 मीटर अंतरासह कांस्य पदक पटकावले.

डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर सुरू झालेल्या नेमबाजी स्पर्धांमध्ये राजस्थानच्या विजय सिंग कुंतल याने 10 मीटर एयर रायफलमध्ये  एसएच2 श्रेणीत सुवर्णपदक पटकावले.

महिलांच्या 10 मीटर एयर रायफल स्टँडिंगमध्ये एसएच-1 प्रकारात राजस्थानच्या मोना अग्रवालने 619.7 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. हरयाणाच्या सिमरन  शर्माने 606.5 गुणांसह रौप्य आणि उत्तर प्रदेशच्या आकांक्षाने 604.6 गुणांसह कांस्य पदक पटकावले.

महाराष्ट्राच्या स्वरुप उन्हाळकरने 10 मीटर एयर रायफलमध्ये एसएच1 श्रेणीत 243.8 गुणांसह सुवर्णपदक पटकावले तर हरयाणाच्या दीपक सैनीने 242.9 गुणांसह रौप्य आणि इशांक आहुजाने कांस्य पदक पटकावले.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1986071) Visitor Counter : 98


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada