पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल विष्णू देव साय यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अरुण साव आणि विजय शर्मा यांचेही पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 13 DEC 2023 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2023

 

विष्णू देव साय यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अरुण साव आणि विजय शर्मा यांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

“छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल विष्णू देव साय यांना आणि उपमुख्यमंत्री अरुण साव आणि विजय शर्मा यांना शुभेच्छा! सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या राज्यातील भाजपा सरकार जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील, असा मला ठाम विश्वास आहे. राज्यातील जनतेच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी डबल इंजिन सरकार कटिबद्ध आहे. @vishnudsai @ArunSao3”

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1986067) आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam