महिला आणि बालविकास मंत्रालय

पोषण अभियान

Posted On: 13 DEC 2023 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2023

 

पोषण (POSHAN) अभियान हा भारत सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून, 8 मार्च 2018 रोजी त्याचा शुभारंभ करण्यात आला होता. देशाच्या पोषण स्थितीमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा घडवण्यासाठी, एक समन्वित आणि परिणामाभिमुख दृष्टिकोन स्वीकारणे, हे याचे उद्दिष्ट आहे. देशातील पोषणविषयक परिणाम उंचावण्यासाठी, सरकारने ‘सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0’ (मिशन पोषण 2.0) कार्यक्रम सुरु केला. यामध्ये पोषण अभियान, अंगणवाडी सेवे अंतर्गत पूरक पोषक आहार कार्यक्रम आणि पौगंडावास्थेतील मुलींसाठीची योजना यांचा समावेश आहे.  

पूरक पोषक आहाराच्या वितरणामध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी सरकारने 13 जानेवारी 2021 रोजी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी सुव्यवस्थित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी (डीएम) हे पोषणाची स्थिती आणि गुणवत्ता मानकांचे निरीक्षण करण्यासाठी जिल्ह्याचे नोडल अधिकारी आहेत. डीएम जिल्हा पोषण समितीच्या उपक्रमांवर देखरेख ठेवतात. मार्गदर्शक सूचनांनुसार, पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी क्षेत्रीय कार्यकर्ते आणि लाभार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी, जिल्हे आणि संबंधित विभागांनी ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषण दिन, वस्ती पातळीवरील कार्यक्रम, जनआंदोलन उपक्रम यासारखे कार्यक्रम आयोजित करणे देखील आवश्यक आहे. या जनआंदोलनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आणि सातत्त्यपूर्ण वर्तणूक बदल घडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

विविध मंत्रालये/विभाग आणि इतर भागाधारकांशी समन्वय साधून वस्ती पातळीवरील कार्यक्रम, पोषण मास आणि पोषण पंधरवडा यासारखे कार्यक्रम आयोजित करून सामाजिक आणि वर्तनात्मक  बदल घडवले गेले आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी सामुदायिक सहभाग कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 90 कोटींहून अधिक जाणीव जागृती उपक्रम राबवले आहेत. याशिवाय, अभियान सुरू झाल्यापासून 3.70 कोटींहून अधिक वस्ती पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

10 लाखांहून अधिक क्षेत्रीय कार्यकर्ते/ अंगणवाडी सेविकांना पोषण समुपदेशनासह योजनेच्या महत्त्वाच्या पैलूंबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी अंगणवाडी सेविकांना नियमीत प्रशिक्षण दिले जात आहे.

महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1985863) Visitor Counter : 80


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali