कृषी मंत्रालय

नवीन कृषी योजनेची लोकसभेत माहिती

Posted On: 12 DEC 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2023


शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अलीकडच्या काही वर्षांत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले नवीन उपक्रम/योजना/कार्यक्रमांचे तपशील परिशिष्टात दिले आहेत.

नीती (NITI) आयोगाच्या विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालया (DMEO) द्वारे, 2020 मध्ये केंद्रसरकारने प्रायोजित केलेल्या कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन क्षेत्रातील योजनांचे मूल्यमापन करण्यात आले. अहवालात असे आढळून आले की, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या केंद्र प्रायोजित योजना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अत्यंत सुसंगत आहेत, आणि म्हणून त्या सुरु ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या योजनांच्या अंमलबजावणीचे बारकाईने निरीक्षण केले जाते आणि नियमितपणे त्याचे उच्च स्तरावर पुनरावलोकन केले जाते, आणि सरकार सर्व संबंधित भागधारकांशी सातत्त्याने सल्लामसलत करते, जेणे करून, कोणतीही आव्हाने किंवा अडथळे त्वरीत ओळखले जातील आणि योग्य उपाययोजना वेळेवर सुनिश्चित केल्या जातील.  

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1985609) Visitor Counter : 96


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi