ऊर्जा मंत्रालय
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबर 2023 रोजी होणार साजरा
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन , राष्ट्रीय ऊर्जा नवोन्मेष आणि ऊर्जा संवर्धन चित्रकला स्पर्धा पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते करणार प्रदान
Posted On:
12 DEC 2023 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2023
ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व लोकांना पटवून सांगण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमता तसेच संवर्धन अशा क्षेत्रात, भारताच्या उपलब्धी लोकांसमोर आणण्याच्या हेतून, दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा, येत्या 14 डिसेंबरला,नवी दिल्लीत विज्ञान भवनात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्यां म्हणून उपस्थित राहणार असून,त्यांच्या हस्ते, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा नवोन्मेष पुरस्कार आणि ऊर्जा संवर्धन चित्रकला स्पर्धा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ऊर्जा कार्यक्षमता विभागाद्वारे, हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन सोहळा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रपती उपस्थितांना मार्गदर्शन करतील आणि राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार 2023 आणि ऊर्जा संवर्धन 2023 वरील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानही करतील.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन आणि पुरस्कारांचे आयोजन भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ऊर्जा कार्यक्षमता विभागाद्वारे केले जात आहे. ऊर्जा संवर्धन कायदा 2001 अंतर्गत, भारतातील ऊर्जा कार्यक्षमता आणि त्याच्या संवर्धनाचे नियमन आणि प्रोत्साहन करण्यासाठी अनिवार्य आहे.
केंद्रीय ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यावेळी संबोधित करतील. केंद्रीय ऊर्जा आणि अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल आणि ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल हे देखील उपस्थित राहणार आहेत.
S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1985516)
Visitor Counter : 166