गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले स्वागत

Posted On: 11 DEC 2023 3:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शहा  यांनी स्वागत केले आहे.

X मंचावरील  आपल्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 5 ऑगस्ट 2019 रोजी, पंतप्रधान  नरेंद्र मोदी जी यांनी कलम 370 रद्द करण्याचा दूरदर्शी निर्णय घेतला.कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आणि सामान्य परिस्थिती पुन्हा प्रस्थापित  झाली आहे. एकेकाळी हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या खोऱ्यात वृद्धी  आणि विकासामुळे मानवी जीवनाला नवा अर्थ प्राप्त झाला आहे. पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील समृद्धीमुळे जम्मू, काश्मीर आणि लद्दाख  या दोन्ही भागातील रहिवाशांच्या उत्पन्नाचा स्तर वाढला आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे घटनात्मक होता हे आजच्या  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सिद्ध झाले आहे''.

कलम 370 रद्द केल्यानंतर गरीब आणि वंचितांचे हक्क त्यांना पुन्हा मिळवून देण्यात आले आहेत  आणि फुटीरतावाद आणि दगडफेक या गोष्टी आता  भूतकाळात जमा झाल्या आहेत, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. संपूर्ण प्रदेशात  आता मधुर संगीत ऐकू येत असून सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळाली आहे. एकात्मतेचे बंध दृढ झाले आहेत आणि भारतासोबतची अखंडता बळकट झाली आहे. पुन्हा एकदा जम्मू काश्मीर  आणि लद्दाख  हा आपल्या देशाचा भाग आहे आणि पुढेही राहील.  पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे. नवीन प्रोत्साहनांसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे असो, अत्याधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करणे असो किंवा गरिबांना कल्याणकारी लाभांसह  सक्षम करणे असो, आम्ही या प्रदेशासाठी सर्व सामर्थ्यनिशी कार्यरत  राहू.

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984978) Visitor Counter : 192