नागरी उड्डाण मंत्रालय

विमान रद्द झाल्यास अथवा विलंब झाल्यास प्रवाशांना देय असणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात मार्गदर्शक सूचना

Posted On: 11 DEC 2023 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाद्वारे जारी नागरी हवाई वाहतूक आवश्यकता (CAR) तरतुदींच्या कलम 3, मालिका एम, भाग 4 मधे, " प्रवाशांना प्रवेश मनाई केल्यास, किंवा विमान रद्द अथवा विलंबाने आल्यास प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा" या शीर्षका अंतर्गत, विमान वाहतूक सेवेने, विमान रद्द अथवा विलंबामुळे नुकसान झालेल्या प्रवाशांना आवश्यक ती नुकसान भरपाई/ सुविधा देणे अनिवार्य आहे.

या तरतुदीं अंतर्गत, विमान वाहतूक सेवेला खालील सुविधा द्याव्या लागतील :

  1. विमान रद्द झाल्यास, वाहतूक कंपनीला एकत्र पर्यायी विमानात जागा किंवा मग तिकीटाची संपूर्ण रक्कम, नुकसाभरपाईसह अदा करावी लागेल. त्याशिवाय, रद्द झालेल्या विमामासाठी विमान तळावर आलेल्या प्रवाशांना पुढच्या विमानापर्यंत जेवण आणि इतर न्याहरी सुविधा द्याव्या लागतील.
  2. जर विमानाला विलंब होत असेल, तर वाहतूक कंपनीने भोजन/ अल्पोपहार, पर्यायी विमान/तिकीटाची संपूर्ण रक्कम किंवा हॉटेल मध्ये राहण्याची सुविधा अशा सुविधा, विमानाच्या विलंबाचा कालावधी लक्षात घेऊन त्यानुसार द्याव्यात.

मात्र, जर अशा काही घटना किंवा परिस्थिती, ज्यावर विमान कंपन्यांचेही नियंत्रण नाही, त्यामुळे विमानाला विलंब अथवा रद्द झाल्यास, त्यावेळी, प्रवाशांना नुकसान भरपाई देणे, विमान कंपनीसाठी बंधनकारक असणार नाही.

विमानाच्या वेळापत्रकात बिघाडाबद्दलची माहिती जर आधीच सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल, तरीही बाधित प्रवाशांना सुविधा द्याव्या लागतील. त्या सुविधा, मंत्रालयाच्या संकेतस्थळावर, CARS  तसेच DGCA website वर ' प्रवाशांसाठी ची नियमावली म्हणून उपलब्ध आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण काळजी घेण्यास  आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आधीच उपलब्ध आहेत

केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री जनरल (सेवा नि.) डॉ. वी के.सिंह यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाला हे लिखित उत्तर दिले.

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 


 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1984959) Visitor Counter : 117