उपराष्ट्रपती कार्यालय
विश्वगुरु म्हणून आपले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी भारत आपला मार्ग आखत आहे- उपराष्ट्रपती जगदीप धनखड
Posted On:
10 DEC 2023 5:10PM by PIB Mumbai
"विश्वगुरू म्हणून आपले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी भारत आपला मार्ग आखत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी तरुण नेत्यांना भावी पिढ्यांसाठी असा एक मार्ग तयार करण्याचे आवाहन केले, जिथे आशा आकांक्षा आणि मनोधैर्य उंचावेल आणि त्याची प्रचिती आपल्या समृद्ध संस्कृतीची जपणूक करणाऱ्या समृद्ध भारतात दिसून येईल. "आपण 2047 च्या दिशेने वाटचाल करत असताना, स्वतः बद्दल विश्वास बाळगूया, कार्याला सुरुवात करूया, सहयोग वाढवूया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदल घडवणारे बनण्याची आकांक्षा बाळगूया", यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.
आज जमशेदपूरमधील एक्सएलआरआय– झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्याला संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक आणि कृती दोन्हींमधून आर्थिक राष्ट्रवाद आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करून तरुणांमध्ये "स्वदेश" ची भावना पुन्हा रुजवण्याची अत्यावश्यक गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी स्वदेशचे अनेक फायदे स्पष्ट करून सांगितले यामध्ये परकीय चलनाचा साठा राखून ठेवण्यापासून ते उद्योजकतेला चालना देणे आणि रोजगाराच्या संधींना चालना देण्यापर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश होता.‘ अपयशाच्या भीतीपासून सावधगिरी बाळगत स्वतःला विकासाविरोधी आणि वृद्धीविरोधी’ म्हणून घेणे अतिशय नुकसानकारक असल्याचे सांगत उपराष्ट्रपती यांनी नमूद केले की, भीतीपोटी एखाद्या कल्पनेचा पाठपुरावा करण्यापासून स्वतःला दूर ठेवणे हे केवळ स्वत:वरच अन्याय केल्यासारखे होत नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणावर मानवतेवरही अन्याय होतो.
"हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे की यशाची मोजणी ही केवळ बोजड पुस्तके वाचून किंवा उत्कृष्टतेचे शेरे घेऊन होते असे नाही तर सतत नवनवीन शिकण्याची उत्कटता जोपासणे आणि समोर येणाऱ्या आव्हानांवर आपण कशा प्रकारे मात करू शकतो यामधूनही यशाची मोजणी होत असते असेही उपराष्ट्रपतीनी सांगितले.
***
S.Kane/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1984778)
Visitor Counter : 108