वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग विभागाच्या उत्पादन संलग्न योजनेअंतर्गत नवे अर्ज दाखल करण्यासाठी 31डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ
Posted On:
06 DEC 2023 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2023
एकूण वस्त्रोद्योग आणि परिधान (हस्तशिल्पांसह) निर्यातीत भारताचा मानवनिर्मित वस्त्र (एमएमएफ ) उत्पादनांचा (वस्त्र , सूत, कापड , तयार कपडे , मानवनिर्मित वस्त्रापासून तयार कपडे) मोठा वाटा आहे.
एमएमएफ परिधान, एमएमएफ वस्त्र आणि तांत्रिक वस्त्रांवर लक्ष केंद्रित करणार्या वस्त्रांसाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत, 64 निवडक अर्जदारांनी , ओदीशात एक आणि महाराष्ट्रात 10 यासह 14 राज्यांमध्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात 84 युनिट्स स्थापन करणे अपेक्षित आहे.
वस्त्रोद्योगासाठीच्या पीएलआय योजनेंतर्गत ऑनलाइन पोर्टलद्वारे नवीन अर्ज दाखल करण्याची तारीख सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे आणि सध्या अर्ज प्राप्त होत आहेत.
एमएमएफ आणि तांत्रिक वस्त्रोद्योग विभागाच्या क्षमतेचा फायदा घेण्यासाठी उद्योग सज्ज आहेत, वस्त्रोद्योगासाठीच्या पीएलआय योजना आणि राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाद्वारे योग्यरित्या समर्थित देशातील उदयोन्मुख उद्योग विभाग आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983309)
Visitor Counter : 78