खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या खनिज उत्पादनात सप्टेंबर 2023 मध्ये 11.5% वाढ

Posted On: 05 DEC 2023 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2023


सप्टेंबर 2023 (आधार: 2011-12=100) महिन्यासाठी खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक 111.5 वर पोचला असून, सप्टेंबर 2022 मधील पातळीच्या तुलनेत हा निर्देशांक 11.5% ने जास्त आहे. भारतीय खाण ब्युरो (IBM) च्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2023-24 या कालावधीसाठी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकत्रित वाढ 8.7 टक्के आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये महत्त्वाच्या खनिजांची उत्पादन पातळी पुढील प्रमाणे होती : कोळसा 673 लाख टन, लिग्नाइट 29 लाख टन, नैसर्गिक वायू (वापरलेला) 2974 दशलक्ष घन. मी., पेट्रोलियम (कच्चे) 24 लाख टन, बॉक्साइट 1726 हजार टन, क्रोमाईट 117 हजार टन, सोने 113 किलो, लोह खनिज 195 लाख टन, मॅंगनीज धातू 247 हजार टन, चुनखडी 347 लाख टन, फॉस्फोराईट 88 हजार टन, मॅग्नेसाइट 09 हजार टन.


N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1982894) Visitor Counter : 97