माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी दक्षिण दिल्लीतील विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात सहभागी
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2023 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2023
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी आज दक्षिण दिल्लीतील शाहपूर जाट गावात विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितांना विकसित भारताची शपथ दिली आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. देशाला विकासाच्या दिशेने नेणाऱ्या नेत्याची देश गेली 70-75 वर्षे वाट पाहत होता आणि 2014 मध्ये देशाची प्रतिक्षा संपली, असे उपस्थितांना संबोधित करताना लेखी यांनी सांगितले. आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत, पंतप्रधानांनी पात्र कुटुंबाना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य हमी दिली आहे आणि या योजनेत 55 कोटींहून अधिक लोकांना कवच प्राप्त झाले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील सरकारने आयुष्मान भारत योजनेसाठी पसंती दर्शवली नसल्याने ही योजना दिल्लीत लागू करण्यात आली नाही, असे लेखी यांनी सांगितले. लोकांना या योजनांचा लाभ घेता यासाठी त्यांना योजनांबाबत जागरूक करणे ही आपली जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या. असे करण्यात आपण यशस्वी झालो तर आपले जीवनही यशस्वी होईल, असे लेखी यांनी सांगितले. भारत सरकार घरोघरी जाऊन रोगांसंदर्भात शोध घेत आहे आणि लोकांच्या घरा जवळच्या परिसरात आरोग्य शिबिरे भरवत आहे,ज्यांना मोदीजींच्या हमीचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

“भारत एक विकसित देश झाला पाहिजे, भारताने प्रगती केली पाहिजे, भारताने पुढे जावे आणि आपल्या मुलांचे आरोग्य चांगले असावे, हा आपला संकल्प असला पाहिजे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या देशात चांगले डॉक्टर आणि अभियंते असावेत, सर्वत्र स्वच्छता असावी, विकसित भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावूया” असे आवाहन त्यांनी केले.
भारत सरकारने सुरू केलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याच्या उद्देशाने देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे.

याचा भाग म्हणून प्रधानमंत्री स्वनिधी शिबिर,आरोग्य शिबीर ,आयुष्मान कार्ड शिबिर,आधार अद्यतन शिबिर , प्रधानमंत्री उज्ज्वला शिबिर यासारख्या सेवांचा त्याच ठिकाणी लाभ देण्यासाठी दिल्लीतील विविध ठिकाणी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या ठिकाणी व्हॅन भेटी देत आहेत. राष्ट्रीय राजधानीतील लोक विशेषतः महिला विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1982866)
आगंतुक पटल : 136