संरक्षण मंत्रालय

आयएनएस कडमट्ट ही युद्धनौका जपानमध्ये योकोसुका बंदराच्या भेटीवर (2 ते 5 डिसेंबर 23)

Posted On: 03 DEC 2023 9:22AM by PIB Mumbai

आयएनएस कडमट्ट ही उत्तर प्रशांत महासागरात तैनातीवर असलेली युद्धनौका जपानमध्ये योकोसुका येथे 2 डिसेंबर 2023 रोजी दाखल झाली. व्यावसायिक संवाद आणि सामुदायिक कल्याण उपक्रमांसह ऑनबोर्ड भेटींचे या वास्तव्या दरम्यान नियोजन आहे. जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स(JMSDF) सोबत होणाऱ्या संवादात परस्परांच्या जहाजांना भेटी, संकल्पनांची व्यावसायिक स्तरावर देवाणघेवाण, संयुक्त योग शिबिर आणि सागरी भागीदारी सरावासाठी समन्वय बैठकीचा समावेश आहे. योकोसुका येथे 4 डिसेंबर 2023 रोजी जपानमधील भारतीय समुदायाच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा करण्यात येईल.

अलीकडेच 28 नोव्हेंबर 2023 रोजी आयएनएस कडमट्टने जेएमएसडीएफच्या जेएस टोवाडा या जलदगतीच्या युद्धविषयक पाठबळ देणाऱ्या जहाजासोबत इंधन पुनर्भरण हाती घेतले आहे. दोन्ही नौदलांदरम्यान करार झालेल्या रेसिप्रोकल प्रोव्हिजनिंग ऑफ सप्लाय अँड सर्विसेस अंतर्गत हे पुनर्भरण होत आहे.

हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत आणि जपान यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून त्यांच्यातील सागरी सहकार्याला आणखी चालना देण्याच्या उद्देशाने आयएनएस कडमट्टच्या जपान भेटीचे आणि जेएमएसडीएफसोबत संवादाचे नियोजन करण्यात आले आहे.

आयएनएस कडमट्ट ही एक स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी युद्धसज्जता असलेली युद्धनौका असून अत्याधुनिक पाणबुडीविरोधी शस्त्रप्रणालीने ती सुसज्ज आहे.

***

MI/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1982066) Visitor Counter : 75


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu