आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोडेक्स एलिमेंटरियस कमिशनने भरड धान्यांच्या बाबतीत असलेल्या भारतीय मानकांची केली प्रशंसा


भरड धान्यांना सामान्य माणसाच्या आवडीचा पर्याय करण्यात भारताने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भरड धान्ये आणि त्यांचे लाभ जगासमोर ठळकपणे मांडण्यासाठी भारताचा प्रस्ताव हा महत्त्वाचा टप्पा ठरेल: केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय

या पोषक धान्यांसाठीच्या जागतिक मानकांसाठी भारताने पुढे मार्ग दाखवला आहे

Posted On: 01 DEC 2023 2:53PM by PIB Mumbai

 

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ)स्थापन करण्यात आलेल्या 188 सदस्य देश असलेल्या कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन (सीएसी) या आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके निश्चिती संस्थेने भरड धान्यांच्या बाबतीत असलेल्या भारतीय मानकांची प्रशंसा केली आहे. इटलीत रोम येथे भरलेल्या 46 व्या सत्रामध्ये या संस्थेने  या पोषक धान्यांसाठीच्या जागतिक मानकांसाठी सादर केलेला प्रस्ताव देखील स्वीकारला आहे.

भारताने 15 प्रकारच्या भरड धान्यांसाठी दर्जाधारित  8 मानकांसह व्यापक गट प्रमाणके निश्चित केली आहेत आणि त्यांना या आंतरराष्ट्रीय बैठकीदरम्यान जोरदार पाठींबा मिळाला. कोडेक्सकडे सध्या ज्वारी आणि बाजरी यांची मानके आहेत.

भारताने या पोषक धान्यांसाठीच्या विशेषतः नाचणी,सावा, कोदो, चीना आणि कुटकी या धान्यांच्या जागतिक मानकांसाठी डाळींप्रमाणेच गट मानके निश्चित करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे.  युरोपीय महासंघासह 161 सदस्य देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत रोम येथील एफएओ मुख्यालयात झालेल्या सत्रात हा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे होत असताना मिळालेल्या या संस्मरणीय यशाबद्दल भारतीय शिष्टमंडळाचे अभिनंदन केले आहे. भरड धान्यांना सामान्य माणसाच्या आवडीचा पर्याय करण्यात भारताने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भरड धान्ये आणि त्यांचे लाभ जगासमोर ठळकपणे मांडण्यासाठी भारताचा प्रस्ताव हा महत्त्वाचा टप्पा ठरेल असे मत केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी यावेळी मांडले. एफएसएसएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जी कमला वर्धन राव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने, वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे हे लक्षात घेऊनच नव्हे तर या उत्पादनांच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचाही विचार करून भरड धान्यासाठी आंतरराष्ट्रीय गट मानके प्रस्तावित केली होती.

यावेळी एफएसएसएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कमला वर्धन राव यांनी कोडेक्सचे चेअरमन स्टीव्ह वेर्न यांना भरड धान्य मानकांवरील पुस्तक भेट दिले.

सीएसी ने या प्रस्तावाला मान्यता दिल्याने, प्रकल्प दस्तऐवज सादर करणे आणि मसुदा मानके विकसित करण्याचे काम आता भारताकडून सुरू केले जाईल. एफएसएसएआय ने भरडधान्यांच्या 15 प्रकारांसाठी तयार केलेली गट मानके, जे 8 गुणवत्तेचे मापदंड निर्दिष्ट करतात ज्यामध्ये, आर्द्रता समाविष्ट करून घेण्याची कमाल मर्यादा, यूरिक ऍसिड सामग्री, बाह्य पदार्थ, इतर खाद्य धान्य, दोष, भुंगेरे धान्य आणि अपरिपक्व आणि सुकलेली धान्येया सर्व बाबी भरड धान्याच्या जागतिक मानकांच्या विकासासाठी एक महत्त्वाचा पाया म्हणून कार्य करतील. ज्वारी आणि मोती बाजरीसाठी सध्याच्या कोडेक्स मानकांचे देखील इतर भरड धान्यांची गट मानके बनवताना पुनरावलोकन केले जाईल.

सध्याचे सत्र हे कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशनच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केले आहे, भारत 1964 पासून या कमिशनचा सदस्य आहे. भारताने आतापर्यंत विविध कोडेक्स मानके/ग्रंथ आणि मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित परिषदांमध्ये 12 वेळा इडब्ल्यूजी (EWG) चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे तर आणि 28 वेळा इडब्ल्यूजी (EWG) चे सह-अध्यक्ष पद स्वीकारलेले आहे. भारताने प्रस्तावित केलेल्या महत्त्वाच्या मानकांमध्ये भेंडी, बीडब्ल्यूजी मिरपूड, औबर्गिन, सुका आणि निर्जलित लसूण, वाळलेल्या किंवा निर्जलित मिरची आणि पेपरिका, ताजे खजूर,आंब्याची चटणी, चिली सॉस, बटाटे आणि किरकोळ नसलेल्या कंटेनरसाठी लेबलिंग संदर्भातील आवश्यक सामग्री यांचा समावेश आहे.

***

S.Patil/S.Chitnis/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1981609) Visitor Counter : 104


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu