अंतराळ विभाग
नासाच्या प्रमुखांनी डॉ जितेंद्र सिंह यांची घेतली भेट, इस्रोसोबत संयुक्त उपग्रह प्रक्षेपित करण्याबाबत दोघांमध्ये झाली चर्चा
Posted On:
28 NOV 2023 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023
पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, (NISAR) नावाचा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह भारत आणि अमेरिका संयुक्तपणे प्रक्षेपित करतील, असे नासाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीत डॉ जितेंद्र सिंह यांची भेट घेतली.
निसार(NISAR) ला भारताच्या जीएस एलव्ही वरून प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य आहे. निसारवरून येणारी माहिती प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील भू परिसंस्था, पर्वत आणि ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश, समुद्रातील बर्फ आणि महासागरांचे किनारे यांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतील.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर ऐतिहासिक चांद्रयान-3 उतरल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांचे अभिनंदन करताना, नेल्सन यांनी डॉ जितेंद्र सिंह यांना नासाचे रॉकेटचा वापरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) भारताच्या पहिल्या अंतराळविषयक कार्यक्रमाला गती देण्याचे आवाहन केले.
उद्या बेंगळुरू येथे भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांना भेटण्यास उत्सुक असल्याचे नेल्सन यांनी यावेळी सांगितले .
या बैठकीला अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी हे देखील उपस्थित होते.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1980508)
Visitor Counter : 134