माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 54 मधील ‘विमेन अँड द ग्लास सीलिंग’ या विषयावरील संवाद सत्रात अभिनेत्री विद्या बालन यांनी प्रेक्षकांशी साधला संवाद
स्त्रिया आता आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहेत, पुरुषांबरोबरचे नातेसंबंध त्यांची ओळख ठरवत नाहीत: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2023
“भारतीय चित्रपटसृष्टीच्या गतकाळातील अभिनेत्रींनी साकारलेल्या सर्व अपवादात्मक भूमिका आणि आणखी काही करण्याची त्यांची मनीषा, याने आम्हाला अशा टप्प्यावर पोहोचण्याचे बळ दिले आहे, जिथे आम्ही चित्रपटांमधून महिला-केंद्रित कथा सांगत आहोत.” अभिनेत्री विद्या बालन यांनी आज गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विमेन अँड द ग्लास सीलिंग’ या विषयावरील संवाद सत्रात सांगितले.
विविध पात्रे साकारण्याची तिची इच्छा प्रकट करताना, या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने सांगितले की, प्रेक्षकांशी नाते जोडू शकतील अशा नवीन कथा आणि पात्रांचा सातत्त्याने शोध घेणे जे अत्यंत महत्वाचे आहे. "अपारंपरिक भूमिका आणि ती पात्रे साकारताना ती जगणे, ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे", त्या म्हणाल्या.

प्रत्येक चित्रपटात बहुपेडी व्यक्तिरेखा साकारण्याच्या आपल्या प्रेरणेबद्दल बोलताना ही अभिनेत्री म्हणाली की, अकल्पनीय भूमिका साकारण्याची आणि भारतीय चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखांची स्टिरियोटाइपिंग (गृहीत धरण्याची प्रथा) मोडण्याची इच्छा त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. “मी करत असलेल्या प्रत्येक चित्रपटात कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची कल्पना मला आवडते आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते जी गोष्ट मला मुक्तता देणारी आहे,”, विद्या बालन म्हणाल्या.
भारतीय चित्रपटातील महिलांच्या चित्रणाचे वैशिष्ट्य अधोरेखित करताना विद्या बालन म्हणाल्या की, आपल्या समाजात रुजलेल्या स्त्रियांबद्दलच्या रूढीवादी कल्पना आपण सर्वांनी दूर करायला हव्यात. “आजच्या जगात स्त्रिया काळाच्या खूप पुढे आहेत”, अभिनेत्रीने अधोरेखित केले.

आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत, या अभिनेत्रीने परिणीता, भूल भुलैया, पा, कहानी, द डर्टी पिक्चर, शकुंतला देवी, शेरनी आणि जलसा यांसारख्या चित्रपटांमधील अपारंपरिक भूमिका मोठ्या ताकदीने साकारल्या आहेत. तिच्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील स्त्री व्यक्तिरेखांचे स्वरूप बदलून टाकले आहे.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane
(Release ID: 1980263)