खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खाण मंत्रालय महत्वपूर्ण खनिजांबाबत जागतिक कृतीवर जी 20 आउटरीच कार्यक्रमाचे करणार आयोजन


महत्वपूर्ण खनिजांची पुरवठा साखळी मजबूत करण्यावर होणार चर्चा

Posted On: 27 NOV 2023 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023

खाण मंत्रालय 29 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदान स्थित भारत मंडपम येथे महत्वपूर्ण खनिजांबाबत जागतिक कृतीला  चालना देण्यात  सरकार आणि उद्योगाची भूमिका या विषयावर एक कार्यक्रम आयोजित करत आहे. या कार्यक्रमाला विविध देशांचे राजदूत/मिशन प्रमुख तसेच भारतातील उद्योगांचे प्रतिनिधी आणि इतर हितधारक उपस्थित राहणार आहेत.

भारताच्या G20 अध्यक्षतेने जागतिक नेतृत्वाची भूमिका बजावत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अध्यक्षपदाचा उपयोग करून घेत  भारत सहकार्यात्मक उपाययोजनांना चालना देत आहे ज्यामुळे केवळ देशातील जनतेचा फायदा होत नाही तर ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘जग एक कुटुंब आहे’ ही भावना बळकट करत व्यापक जागतिक कल्याणासाठी योगदान देत आहे. जी 20 नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्रात महत्वपूर्ण खनिजांवर एक परिच्छेद आहे. घोषणापत्रात  उच्च स्तरीय स्वैच्छिक तत्त्वांची देखील नोंद घेतली आहे.

ऊर्जा संक्रमण कृतिगटाचा एक भाग म्हणून खाण मंत्रालय जी 20 मधील चर्चेत सक्रिय सहभागी झाले होते आणि जी 20 समुदाय ऊर्जा संक्रमणात महत्वाच्या खनिजांच्या भूमिकैची दखल घेईल हे सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारताचे निवेदन भविष्यातील जी 20 कार्यात अंतर्भूत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्रात  मंत्रालये/विभाग सक्रियपणे सहभागी आहेत. खाण मंत्रालय विविध देशांचे राजदूत/मिशन प्रमुख आणि इतर हितधारकांचा समावेश असलेला सध्याचा आउटरीच कार्यक्रम आयोजित करत आहे.

जी 20 चा एक प्रमुख सदस्य म्हणून, भारताने महत्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीला मजबुती देण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम सक्रियपणे हाती घेतले आहेत.

खाण मंत्रालय महत्वपूर्ण खनिजांसाठी एक धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे ज्यामध्ये महत्वाच्या खनिजांची पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी मार्गदर्शक आराखड्याचा समावेश असेल. हे धोरण महत्वाच्या खनिजांच्या पुरवठा साखळीची लवचिकता सुनिश्चित करण्यात  केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या जबाबदाऱ्या देखील निश्चित करेल.  खाण मंत्रालय धातूंच्या पुनर्वापरासाठी  देखील धोरण आखत आहे जे पुनर्वापर क्षमता वाढवण्यास आणि पुनर्वापर प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात मदत करेल आणि खनिज प्रक्रिया आणि कच्च्या मालाची निर्मिती क्षमता संयुक्तपणे विकसित करण्यासाठी भागीदार देशांसोबत काम करेल.

देशांतर्गत यंत्रणा बळकट करण्याव्यतिरिक्त, बहुपक्षीय आणि द्विपक्षीय सहकार्याव्दारे   एक लवचिक महत्त्वपूर्ण खनिज मूल्य साखळी तयार करण्यासाठी एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय प्रयत्न करण्यात आले आहेत. खाण मंत्रालय खनिज सुरक्षा भागीदारी , ऑस्ट्रेलिया-भारत आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार  यांसारख्या नवीन भागीदारी आणि आघाड्यांमध्ये सक्रिय सहभागी आहे.

 

 G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1980190) Visitor Counter : 94