संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना प्रेसिडेंट कलर पुरस्कार प्रदान करतील

Posted On: 27 NOV 2023 1:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023

भारताच्या राष्ट्रपती आणि सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू, शुक्रवारी 1 डिसेंबर 2023 रोजी, पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला  (AFMC), त्यांच्या अमृत  महोत्सवी वर्षानिमित्त प्रेसिडेंट कलर पुरस्कार प्रदान करतील.सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय,आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज ( AFMC) ही एक प्रमुख सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा आस्थापना असून देशातील अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे. हा पुरस्कार  सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेने गेल्या 75 वर्षांपासून देशासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचे द्योतक आहे.

या भव्य समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष लिफाफा आणि टपाल तिकीट तसेच स्मृति नाण्याचे प्रकाशनही होईल.

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अत्याधुनिक आरोग्यसेवा संशोधन करणार्‍या आघाडीच्या जागतिक संस्थांमध्ये    एएफएमसीला महत्वाचे स्थान मिळवून देणाऱ्या  ‘प्रज्ञा’, या आर्म्ड फोर्सेस सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल मेडिसीनचे ई-उद्घाटन देखील राष्ट्रपती यावेळी करणार आहेत.

एएफएमसी येथील कॅप्टन देवाशिष शर्मा कीर्ती चक्र परेड  पटांगणावर हा नेत्रदीपक कार्यक्रम होणार आहे.

समारंभाच्यावेळी होणाऱ्या कार्यक्रमातील  ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे AFMS मध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेल्या सेनादल, नौदल आणि हवाई दलात  सेवा बजावणाऱ्या सशस्त्र सेना महिला वैद्यकीय अधिकारी सेवा कर्मचार्‍यांच्या चार तुकड्यांचे नेतृत्व करतील. 

प्रेसिडेंट कलर पुरस्कार, ज्याला ‘राष्ट्रपती का निशान’ म्हणूनही ओळखले जाते, हा लष्करी तुकडीला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.

या दिमाखदार सोहळ्याला केंद्र आणि राज्य सरकार आणि सशस्त्र दलातील वरिष्ठ मान्यवर आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. माजी संचालक आणि कमांडंट आणि माजी डीन आणि डेप्युटी कमांडंट्ससह दिग्गज अधिकारी देखील यावेळी उपस्थित राहतील.

 

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1980130) Visitor Counter : 207