उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरु नानक जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
26 NOV 2023 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2023
गुरु नानक देव जी यांच्या जयंती निमित्त मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो.
गुरु नानक देव जी यांनी अध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश दाखवला. त्यांची शिकवण मानवतेचा मार्ग दाखवते, सर्व प्राणिमात्रांमधील एकतेवर भर देते आणि समानता, दयाभाव आणि निःस्वार्थी सेवेचा पुरस्कार करते. त्यांचा सहिष्णुता आणि अपार करुणेचा संदेश जात, पंथ, धर्म आणि देशाच्या सीमा ओलांडून मानवजातीला मार्गदर्शन करत आहे.
आजच्या शुभ दिवशी प्रामाणिकपणा, समरसता आणि वैश्विक बंधुत्वाच्या तत्त्वांचे प्रदर्शन आणि आचरण करूया.
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1979954)
आगंतुक पटल : 148