सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
सीजीटीएमएसईने गाठला महत्त्वाचा टप्पा ,आर्थिक वर्ष 2023-24 च्या केवळ 7 महिन्यांत 1 लाख कोटी रुपयांच्या पत हमीला मंजुरी दिली - केंद्रीय मंत्री नारायण राणे
Posted On:
24 NOV 2023 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023
सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या पत हमी क्रेडिट हमी योजनेने चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या केवळ 7 महिन्यांत 1 लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 12 महिन्यांत हे साध्य झाले होते. X (पूर्वीचे ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) सोशल मीडिया पोस्टमध्ये याची घोषणा करताना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सीजीटीएमएसईच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला.
ते म्हणाले की, ही कामगिरी एमएसएमईंना पाठिंबा देण्याच्या आणि त्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या अतूट वचनबद्धतेचा दाखला आहे.
सीजीटीएमएसई एमएसएमई ना विशेषत: अनौपचारिक क्षेत्रात पतपुरवठा सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पत हमी मंजुरीची गती एमएसएमईंना आर्थिक सहाय्य सुलभ करण्याच्या सरकारच्या सक्रिय उपाययोजना प्रतिबिंबित करते, आणि देशाच्या आर्थिक विकासातील त्यांच्या योगदानाला चालना देते.
राणे पुढे म्हणाले की, सीजीटीएमएसईच्या अभूतपूर्व यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अखंड पाठिंब्याला आणि दूरदर्शी नेतृत्वाला जाते . त्यांचे धोरणात्मक मार्गदर्शन आणि एमएसएमई क्षेत्राला सक्षम बनवण्याच्या समर्पित वृत्तीने हा टप्पा गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांनी सीजीटीएमएसईच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि लिहिले की, केवळ 7 महिन्यांत 1 लाख कोटी रुपयांची पत हमी मंजूर होणे हा महत्वाचा टप्पा आहे.
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979641)
Visitor Counter : 110