रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तरकाशी बोगद्यातील बचावकार्याबाबत प्रसारमाध्यमांसाठी ताजी माहिती 24.11.2023 (दुपारी तीन वाजेपर्यंतची प्रत्यक्ष स्थळावरील माहिती )


सिलक्यारा बोगदा कोसळलेल्या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर

Posted On: 24 NOV 2023 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023

उत्तरकाशी इथल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी सरकारकडून  बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मजुरांची सुरक्षा हा सर्व प्रयत्नांचा केंद्रबिंदू असून बोगद्याच्या 2 किलोमीटर भागाचे कॉक्रीटीकरण पूर्ण झाल्याने मजुरांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती झाली आहे. मजुरांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी विविध सरकारी संस्था त्यांना सोपवण्यात येणारी विशिष्ट कार्ये अथकपणे करत आहेत.

बचाव कार्याविषयीच्या माहितीतले ठळक मुद्दे   :

  • दुसऱ्या जीवनवाहिनीचा ( 150 मिमी व्यास) उपयोग करून नियमित वेळाने ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे आतमध्ये पुरवली जात आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक मदत पुरवण्यासाठी, ही जीवनवाहिनी सुरुवातीच्या ठिकाणापासून  12 मीटर अंतरापर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • नियमित संवादासाठी वायर कनेक्टिव्हिटीसह एसडीआरएफद्वारे विकसित  सुधारित दूरसंवाद प्रणाली वापरली जात आहे. आतमध्ये असलेल्या लोकांनी आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
  • ड्रिलिंग यंत्रे  घटनास्थळी दाखल झाली असून ती सुरू करण्यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्मचे काम  पूर्ण झाले आहे.
  • बारकोट टोकापासून बचाव बोगदा काढण्यासाठी टीएचडीसीने बांधकाम सुरू केले आहे. यासाठी चार स्फोट करण्यात आले असून 9.10 मीटर अपवहन तयार झाले आहे.
  • बीआरओने (सीमा रस्ते संघटना) 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण करून आरव्हीएनएलला हस्तांतरित केला आहे. ड्रिलिंगसाठीचे यंत्र बीआरओने या स्थळी  पोहोचवले आहे.
  • आरव्हीएनएलला विद्युत जोडणी पुरवण्यात आली आहे.
  • उभे किंवा लंब रेषेतील ड्रिलिंग 26.11.2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  • इंदोर येथून  एअर ड्रिलिंग रिग मशीन आणण्यात आले आहे. क्षेत्र सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ओएनजीसीद्वारे अहवाल सादर केला जाईल.
  • ओएनजीसीद्वारे केलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आधारे बीआरओ ओएनजीसीसाठी नजीकचा मार्ग बांधत आहे. असा 700 मीटरचा मार्ग आतापर्यंत बांधून झाला आहे.

पार्श्वभूमी :

सिलक्यारा ते बारकोट दरम्यान बांधकामाधीन बोगद्यात 12 नोव्हेंबर  2023 रोजी सिलक्याऱ्याच्या बाजूच्या 60 मीटरच्या पट्ट्यात ढिगारा कोसळला. यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ प्रयत्न सुरू केले.  

 

 

 

G.Chippalkatti/S.Kakade/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1979561)
Read this release in: Urdu , English , Hindi , Punjabi