अर्थ मंत्रालय

राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटिक्स अकादमी (NACIN) आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (NADT) यांनी संसाधनांच्या सामायिकीकरणासाठी सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी

Posted On: 24 NOV 2023 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023

राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटिक्स अकादमी  (एनएसीआयएन)  आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी  (एनएडीटी) यांनी  आज सर्वोत्तम पद्धती, तज्ञ प्राध्यापक, प्रशिक्षण साहित्य आणि अभिनव तंत्रज्ञान यासारख्या संसाधनांच्या सामायिकीकरणासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

सामंजस्य करारावर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे  प्रधान महासंचालक(प्रशिक्षण ) जयंत दिड्डी आणि राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटिक्स अकादमीचे महासंचालक डॉ. के.एन. राघवन यांनी स्वाक्षरी केली. सीबीडीटीचे  प्रशासन  सदस्य रवी अग्रवाल, सीबीआयसीचे सदस्य (प्रशासन आणि दक्षता)  आलोक शुक्ला, राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटिक्स अकादमीचे अतिरिक्त महासंचालक रमेश चंदर आणि दोन्ही अकादमींचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

एनएसीआयएन  आणि एनएडीटी यांनी  सर्वोत्तम पद्धती, तज्ञ शिक्षक, प्रशिक्षण साहित्य आणि अभिनव तंत्रज्ञान सारखी संसाधने सामायिक करण्यासाठी सहकार्याचे महत्व ओळखले आहे.  सामंजस्य कराराच्या कक्षेत येणाऱ्या कर आकारणी, कायदा आणि कायदेशीर प्रणाली, व्यावसायिक आणि प्रक्रियात्मक कायदे, आर्थिक आणि प्रशासकीय कायदा, डेटा नालिसिस , डार्क वेब एक्सप्लोरेशन आणि जोखीम व्यवस्थापन आणि नैतिकता यांसारख्या अत्याधुनिक तपास तंत्रांमध्ये संसाधने आणि अध्यापनशास्त्रांच्या सामायिकीकरणाचे सहकार्यात्मक प्रयत्न यांसारख्या सामायिक हिताच्या क्षेत्रांवर हे सहकार्य लक्ष केंद्रित आहे.

एनएसीआयएन बद्दल

एनएसीआयएन ही भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) च्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) अंतर्गत सर्व अधिकारी आणि कॅडरसाठी सेवा काळात प्रशिक्षण देखील देते.

एनएडीटी  बद्दल

एनएडीटी नागपूर ही भारतीय महसूल सेवा (आयकर) अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या मध्यम ते वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील अधिका-यांसाठी सेवेतील विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे.

 

 

 

 

S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979505) Visitor Counter : 51


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu