माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 3

इफ्फी 54 मध्ये 'जागतिक स्तरावर भारतीय माहितीपट' या विषयावर मास्टर क्लास सत्राचे आयोजन


माहितीपटासाठीची, आवड निर्माता-दिग्दर्शकांना प्रेरित करते : दिग्दर्शक मिरियम चंडी मेनाचेरी

माहितीपट निर्मिती म्हणजे सामायिक मानवी अनुभवांच्या माध्यमातून जोडले जाणे : माहितीपट निर्माता नीलोत्पल मुझुमदार

माहितीपट निर्मितीमध्ये पैशाला दुय्यम स्थान आहे: आर.व्ही. रमाणी

गोवा/मुंबई, 23 नोव्‍हेंबर 2023

 

54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून, आज गोव्यातील कला अकादमीमध्ये आयोजित कार्तिकी गोन्झाल्विस, आरव्ही रमाणी, मिरियम चंडी मेनाचेरी, साई अभिषेक आणि नीलोत्पल मजुमदार यांचे 'जागतिक स्तरावर भारतीय माहितीपट' यावर मास्टर क्लास सत्र आयोजित करण्यात आले होते.

निवेदक  अंशुल चतुर्वेदी यांच्याशी माहितीपटांवरील चर्चेत, माहितीपट निर्मात्यांनी माहितीपटाच्या निर्मितीचे सार आणि आव्हाने यावर मार्गदर्शक आणि मौल्यवान विचार सामायिक केले. भारतीय माहितीपटांनी जागतिक स्तरावर ओळख मिळवली आहे, प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन आणि प्रशंसा मिळवली आहे.

प्रख्यात माहितीपट निर्माती कार्तिका गोन्साल्विस तिच्या उद्बोधक  कथाकथन आणि विविध सांस्कृतिक परिदृश्यांची चाचपणी यासाठी ओळखली जाते. तिने सांगितले की तथ्यावर आधारित  कथा वास्तविकतेत त्यांचे सत्य शोधतात, शिकण्याच्या आणि परिवर्तनाच्या समृद्ध प्रवासाला चालना देतात. ‘‘माहितीपटांसाठी  सहाय्यक व्यवस्थाना बळ देण्यात सहकार्य  महत्त्वपूर्ण आहे ” असे तिने सांगितले.

कलात्मकता आणि सामाजिक प्रासंगिकता मांडणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आर.व्ही. रमाणी म्हणाले, ‘‘माहितीपट  निर्मितीचे प्राथमिक सार तथ्यात्मक कथांचे प्रामाणिक चित्रण करण्यात आहे आणि  यातून मिळणारा पैसा दुय्यम बाब आहे.’’

  

दिग्दर्शिका आणि निर्माती मिरियम चंडी मेनाचेरी आकर्षक माहितीपटांद्वारे न सांगितलेल्या कथा सांगण्यासाठी प्रसिद्ध असून  तिच्या प्रवासात त्याचे प्रतिबिंब उमटते असे  तिने अधोरेखित केले.  "माहितीपटाची आवड त्याची कथा सांगणाऱ्यांना प्रेरित करत असली, तरीही, वित्तपुरवठा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मुख्य प्रवाहातील माध्यमांप्रमाणेच नवोदित निर्मात्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे, अशी वेगळी भूमिका मेनाचेरी यांनी मांडली.

प्रभावशाली सिनेमॅटिक कथनातून संस्कृती आणि समुदायांना एकत्र जोडणारा माहितीपट क्षेत्रातील  आघाडीचा निर्माता साई अभिषेक यांनी भारताच्या आशावादी माहितीपट परिदृश्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले, "उत्साही प्रेक्षक आहेत, मात्र मुख्य प्रवाहातील सिनेमाशी तुलना करता येईल अशा मजबूत परिसंस्थेची कमतरता आहे.  'फिल्म क्लब आणि डिस्ट्रिब्युशन चॅनेल यासारख्या सहाय्यक व्यवस्था महत्त्वपूर्ण आहेत यावर त्यांनी भर दिला.

सामाजिक बारकावे आणि मानवी अनुभवांच्या मार्मिक चित्रणासाठी ओळखले जाणारे माहितीपट  निर्माते नीलोत्पल मुझुमदार म्हणाले, "माहितीपट निर्मिती कथाकथनाला काल्पनिकतेपासून मुक्त करते, जीवनाशी संवाद साधते आणि सामायिक मानवी अनुभवांद्वारे जोडले जाण्याशी संबंधित आहे.

या प्रसंगी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील संचालक (चित्रपट) आर्मस्ट्राँग पेम यांनी स्पष्ट केले की माहिती आणि प्रसारण मंत्रालय सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता आणि  फिल्म अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे माहितीपट निर्मितीचा एक अल्प -मुदतीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे.  दूरदर्शनवर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या माहितीपटांबरोबच इतर माहितीपट दाखवण्यासाठी ठराविक वेळ देण्याची घोषणाही त्यांनी केली.पेम यांनी अधोरेखित केले की चित्रपट निर्मिती आणि सहनिर्मितीसाठी एनएफडीसीच्या माध्यमातून इफ्फी फिल्म बाजारमध्ये यावर्षीपासून 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

* * *

PIB Mumbai | R.Aghor/S.Kane/D.Rane

iffi reel

(Release ID: 1979281) Visitor Counter : 134