कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान मोदीं यांनी नागरिक- केंद्रित प्रशासन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर केला- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह


“पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या प्रशासन सुधारणा केवळ शासनापुरत्या मर्यादित नाहीत, त्यांचा मोठा सामाजिक आर्थिक प्रभाव देखील आहे”: डॉ जितेंद्र सिंह

प्रविष्टि तिथि: 23 NOV 2023 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर करून नागरिक-केंद्रित प्रशासन दिले आहे असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. गेल्या सुमारे दहा वर्षांत याचा एकंदर जाणवलेला परिणाम म्हणजे नवीन कार्यसंस्कृतीचा उदय, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून  भ्रष्टाचाराला आळा घालण्यात , पारदर्शकता वाढवण्यात , तक्रारींचे वेगाने निराकरण करण्यात आणि नागरिकांना शासनात सहभागी करून घेण्यात मदत झाली आहे असे  ते म्हणाले.

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन राज्यमंत्री आज नवी दिल्ली येथे भारतीय लोक प्रशासन संस्थाद्वारे आयोजित 'सार्वजनिक प्रशासन आणि नागरिक केंद्रित शासन: प्राधान्यक्रम, धोरणे आणि रणनीती ' यावरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करत होते. जर तंत्रज्ञान हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 9-10 वर्षांतील संपूर्ण प्रशासन प्रक्रियेचे वैशिष्ट्य असेल तर, सुशासनाच्या या प्रत्येक घटकाचा वापर तंत्रज्ञानाच्या वापरासह उत्तम कामकाजासाठी केला गेला आहे. असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, तंत्रज्ञानाच्या मदतीने मध्यस्थांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि गळतीला आळा घालण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण वापरणारा भारत हा पहिला देश आहे.  कोविड महामारीच्या कठीण काळात शेतकरी आणि गरीब लोकांना सामाजिक कल्याण योजनांचा लाभ नाकारला जाणार नाही हे थेट लाभ हस्तांतरणने सुनिश्चित केले.

पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या प्रशासन सुधारणा केवळ प्रशासनापुरत्या मर्यादित नाहीत, त्यांचा मोठा सामाजिक-आर्थिक प्रभावही आहे, असे ते म्हणाले.

भारताला विकसित भारत@2047 मध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने आजच्या युवकांना अमृत काळात  शिल्पकार बनवण्यात भारतीय लोक प्रशासन संस्था उत्प्रेरक ठरेल असा विश्वास डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.  ई-गव्हर्नन्सवर भर देत सिंह  म्हणाले की, यामुळे सरकारचे कामकाज सुलभ, कमी खर्चिक आणि पर्यावरण-स्नेही झाले आहे.

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1979217) आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi