राष्ट्रपती कार्यालय

गुरू तेग बहादूरजींच्या ‘शहीद दिना’च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश

Posted On: 23 NOV 2023 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु तेग बहादूर यांच्या ‘शहीद दिना’च्या पूर्वसंध्येला ‍दिलेल्या संदेशात म्हटले आहे:-

गुरू तेग बहादूर जी यांना त्यांच्या हुतात्मा दिनी मी  आदरांजली अर्पण करते.

गुरू तेग बहादूर जी यांनी मानवी मूल्ये आणि हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. गुरु तेग बहादूरजींनी प्रेम, करुणा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. त्यांची शिकवण आपल्याला मानवतेची सेवा करण्यासाठी आणि सर्वांमध्‍ये  एकता वृध्दिंगत करण्याची प्रेरणा देते.

गुरू तेग बहादूर जी यांचे जीवन आणि शिकवण आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करत राहो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा :

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979140) Visitor Counter : 65