संरक्षण मंत्रालय
संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्त संशोधन आणि विकास कार्यांसाठी, एकात्मिक संरक्षण दल कर्मचारीवर्ग मुख्यालय आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांच्यादरम्यान सामंजस्य करार
Posted On:
23 NOV 2023 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023
संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्त संशोधन आणि विकास कार्यांसाठी, एकात्मिक संरक्षण दल कर्मचारीवर्ग मुख्यालय आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांच्यादरम्यान आज 23 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे सामंजस्य करार करण्यात आला.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचारीवर्ग समिती प्रमुखांच्या अध्यक्षांचे एकात्मिक संरक्षण दल कर्मचारीवर्ग प्रमुख लेफ्टनंट जनरल जे पी मॅथ्यू आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव आणि सीएसआयआरचे महासंचालक डॉ.एन कलाईसेल्वी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
संरक्षण क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आणि दुहेरी वापर करता येण्याजोग्या तंत्रज्ञानांमधील संयुक्त संशोधन आणि विकास उपक्रम हाती घेण्यासाठी सीएसआयआर प्रयोगशाळा, एकात्मिक संरक्षण कर्मचारीवर्ग मुख्यालय आणि भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांमधील सहयोगात्मक परस्परसंवाद सुरु करण्यासाठी आवश्यक समावेशी आराखडा तयार करणे, हे एकात्मिक संरक्षण कर्मचारीवर्ग मुख्यालय आणि सीएसआयआर यांच्यात झालेल्या कराराचे उद्दिष्ट आहे.
भारतीय सशस्त्र दलांना मदत करण्यासाठी ‘वैज्ञानिक सहकार्या’च्या सच्च्या प्रेरणेसह परस्परांच्या लाभासाठी संरक्षण तंत्रज्ञानांमध्ये संयुक्त संशोधन आणि विकास कार्य हाती घेण्यात एकात्मिक संरक्षण कर्मचारीवर्ग मुख्यालय आणि सीएसआयआर या दोन्ही संस्थांना सामायिक स्वारस्य आहे. ही भागीदारी, ‘आत्मनिर्भर भारता’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या स्वदेशीकरणाला देखील वेग देईल.
S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979123)
Visitor Counter : 113