संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल प्रश्नमंजुषा-जी 20 थिंक (THINQ) आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीचे 23 नोव्हेंबर 23 रोजी इंडिया गेटवर आयोजन
प्रविष्टि तिथि:
22 NOV 2023 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2023
भारताने स्वीकारलेल्या प्रतिष्ठित जी 20 च्या अध्यक्षपदासह ‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या निमित्ताने भारतीय नौदलाची प्रश्नमंजुषा थिंक ( THINQ) या वर्षी जागतिक झाली. अशाप्रकारे, प्रश्नमंजुषेची "G20 THINQ" म्हणून योग्यरित्या पुनर्रचना करण्यात आली असून त्यात 'राष्ट्रीय' आणि 'आंतरराष्ट्रीय' फेरीचा समावेश करण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय अंतिम फेरी आता 23 नोव्हेंबर 23 रोजी प्रतिष्ठित इंडिया गेटवर आयोजित केली जाणार आहे.
राष्ट्रीय फेरी - जी 20 THINQ च्या राष्ट्रीय फेरीत 11741 शाळांचा सहभाग होता ज्यात नववी ते बारावी/तत्सम विद्यार्थ्यांच्या दोन ऑनलाइन बाद फेऱ्या, ऑनलाइन उपांत्यपूर्व फेरी आणि टाय ब्रेकरच्या माध्यमातून 16 स्पर्धक उपांत्य फेरीत दाखल झाले , 17-18 नोव्हेंबर 23 रोजी अनुक्रमे एनसीपीए सभागृह आणि गेटवे ऑफ इंडिया येथे राष्ट्रीय उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी घेण्यात आली. स्पर्धा प्रबळ होती आणि राष्ट्रीय फेरीतील उदयोन्मुख विजेते ठरलेला गुरुग्रामच्या डीएव्ही पब्लिक शाळेचा संघ आता आंतरराष्ट्रीय फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या स्पर्धेच्या तपशीलासाठी लिंक - (https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1978097)
आंतरराष्ट्रीय फेरी- सर्व जी 20+09 राष्ट्रांमधील संघांसह G20 THINQ च्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे नियोजन करण्यात आले. या प्रस्तावाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जी 20 सचिवालयाने देशांपर्यंत पोहोचण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, परिणामी 23 आंतरराष्ट्रीय संघांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी केली.
|
Argentina
|
Australia
|
Bangladesh
|
Brazil
|
EU (02 teams)
|
|
France
|
Germany
|
Indonesia
|
Italy
|
Japan
|
|
Mauritius
|
Mexico
|
Netherlands
|
Nigeria
|
Oman
|
|
Republic of Korea
|
Russia
|
Saudi Arabia
|
Singapore
|
South Africa
|
|
USA
|
United Kingdom
|
|
|
|
23 आंतरराष्ट्रीय संघांनी 21 नोव्हेंबर 23 रोजी सुषमा स्वराज भवन येथे 03 उपांत्य फेऱ्या आणि वाइल्ड कार्ड फेरीत सहभाग घेतला. , यामधून अव्वल आठ संघांनी आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत प्रवेश केला.अमिताभ कांत (शेर्पा जी 20), नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार, ,एनडब्ल्यूडब्लूएच्या अध्यक्ष कला हरी कुमार आणि कार्मिक प्रमुख व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उपांत्य फेरीचे आयोजन करण्यात आले होते. .
या स्पर्धेच्या तपशीलासाठी लिंक ---- (https://x.com/amitabhk87/status/1726899635565031626?s=20)
विविध स्थानिक शाळांमधील विद्यार्थी, नौदल कर्मचारी, सरकारी अधिकारी आणि नागरी संस्थांचे विविध विभाग आणि परदेशी राजनैतिक अधिकारी यांच्यासह उपस्थित प्रेक्षक प्रश्नमंजुषा तज्ज्ञ व्यंकटेश श्रीनिवासन यांनी आयोजित केलेल्या चित्तवेधक उपांत्य फेरीचे साक्षीदार झाले.
तुल्यबळ 23 संघांमधून उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेले अव्वल 08 संघ आता प्रतिष्ठित इंडिया गेटवर आयोजित आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीसाठी सहभागी होतील. 23 नोव्हेंबर रोजी इंडिया गेटवर आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होणारे संघ खालील प्रमाणे आहेत:
|
Australia
|
Bharat
|
Brazil
|
European Union
|
Germany
|
|
Italy
|
Netherlands
|
Saudi Arabia
|
Singapore
|
|
(https://x.com/NWWA_INDIANNAVY/status/1726908709501272158?s=20)
23 नोव्हेंबर 23 रोजी संध्याकाळी ही महाअंतिम फेरी होणार असून हे आयोजन बौद्धिक देवाणघेवाण आणि स्पर्धेसाठी जागतिक मंच प्रदान करेल. भारत आता 01 डिसेंबर 23 पासून ब्राझीलकडे जी 20 चे अध्यक्षपद सोपवणार आहे. G20 THINQ हा महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या मालिकेचा शेवटचा भाग असेल. जागतिक स्तरावर जी 20 च्या अनेक अनोख्या कामगिरीचे साक्षीदार असलेल्या भारताच्या अध्यक्षपदासाठी हा एक उल्लेखनीय समारोप असेल.


S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1978766)
आगंतुक पटल : 123