भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

सीसीआयने टायटन द्वारे कॅरेटलेनमध्ये अतिरिक्त हिस्सेदारी अधिग्रहित करण्यास दिली मंजुरी

प्रविष्टि तिथि: 21 NOV 2023 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2023

भारतीय स्पर्धा आयोगाने(सीसीआय )आज टायटन कंपनी लिमिटेड (Titan) द्वारे कॅरेटलेन ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (CaratLane)मध्ये अतिरिक्त हिस्सेदारी अधिग्रहणाला मंजुरी  दिली .  प्रस्तावित संयोजन टायटनद्वारे मिथुन पदम सचेती, सिद्धार्थपदम सचेती आणि पदमचंद सचेती यांच्याकडून पूर्णपणे समभागांमध्ये परिवर्तित केलेल्या कॅरेटलेन (टायटनची एक उपकंपनी) च्या 27.18% भाग भांडवलाच्या अधिग्रहणाशी संबंधित आहे.टायटन ही एक सार्वजनिकसूचीबद्ध कंपनी असून दागिने, नेत्रचिकित्सा,सुगंध, फॅशनअॅक्सेसरीज आणि भारतीय पोशाख यासह जीवनशैलीशी निगडित  अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय आहे.कॅरेटलेन ही खाजगी  कंपनी असून भारतातील रत्ने आणि आभूषणांच्या निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे.

यासंबंधी सीसीआयचा सविस्तर आदेश लवकरच येईल.

 

R.Aghor/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1978641) आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Telugu