माहिती आणि प्रसारण मंत्रालय
54 व्या इफ्फीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते भारतीय चित्रपटांचे वैशिष्ट्य टिपणाऱ्या ‘सीबीसी’ प्रदर्शनाचे अनावरण
सिनेप्रेमींसाठी आगळा अनुभव घेवून, नवे शिकण्यासाठी योग्य स्थान : केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची प्रदर्शनाला भेट
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2023
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोव्यामध्ये सुरू असलेल्या 54 व्या ‘इफ्फी’मध्ये ‘सीबीसी’ म्हणजेच केंद्रीय जनसंपर्क कार्यालयाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या वर्षीच्या ‘सीबीसी’ प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि भविष्यकालीन संभाव्य कल यांचा विचार करून भारतीय चित्रपट आणि त्यांच्या योगदानाचे प्रदर्शन करण्यात आले आहे. कला अकादमी, पणजी येथे केंद्रीय दळणवळण विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय (आय अँड बी) द्वारे डिजिटल माध्यमाव्दारे हे प्रदर्शन करण्यात आले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचे कौतुक केले. अशा प्रदर्शनांचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, प्रदर्शनातील प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. व्हीएफएक्स सारखे नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे निर्माण झालेले आभासी वास्तव पाहण्यासारखे आहे. यामुळे, प्रदर्शन पाहणारी प्रत्येक व्यक्ती सिनेमाच्या जगामध्ये तल्लीन होवून जाते आणि प्रदर्शन अनोखा अनुभव प्रदान करते. ते पुढे म्हणाले, “सिनेमाप्रेमींच्या दृष्टीने इथे भेट देवून नवा आगळा अनुभव घेण्यासाठी आणि नवीन काही शिकण्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे योग्य ठिकाण आहे.’’
‘भारतीय सिनेमा’ या मुख्य संकल्पनेवर हे प्रदर्शन आधारित आहे. त्यामध्ये सिनेमाच्या विविध पैलूंचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण, सामाजिक कारणे आणि वर्तनातील परिवर्तन, महात्मा गांधी यांची विचारधारा, युवकांसाठी प्रेरणादायी विचार, राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्द, आणि प्रादेशिक भाषा आणि संस्कृती, अशा विविध विषयांवर आधारित सिनेमातील दृश्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

प्रदर्शन परस्परसंवादी असल्यामुळे चित्रपट रसिकांना सिनेमाबद्दल जाणून घेण्याची परवानगीही आहे. त्यामुळे प्रदर्शन अधिक आकर्षक बनले आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, डिजिटल पझल, इमर्सिव्ह रूम, डिजिटल फ्लिपबुक इत्यादी विविध तंत्रज्ञानामुळे प्रदर्शन पाहणा-यांच्या ज्ञानामध्ये आणि अनुभवामध्ये भर पडते.

प्रदर्शनात देशभक्तीच्या संकल्पनेवर आधारित स्वातंत्र्यपूर्व काळातील गाण्यांचा विशेष विभागही आहे. यामध्ये पुढील गाण्यांचा समावेश आहे:
1. वतन से चला है वतन का सिपाही_चांद _1944
2. यह देश हमारा प्यारा_हमजोली 1946
3. ए हिंद के सपुतो जागो हुआ सवेरा, चित्रपट - कोशिश 1943
4. गुलामी 1945_ ए वतन मेरे वतन तुझ पे मेरी जान निसार
5. माता माता भारत माता (Hd) - तकदीर (1943) गाणे - नर्गिस - मोतीलाल - चंद्र मोहन
6. (1943)_दूर हटो ए दुनिया वालो - किस्मत पूर्ण गाणे
7. चलो सिपाही, करो सफाई- ब्रह्मचारी- 1938
8. 1940- चल चल रे नौजवान_बंधन
9. हम पंछी है आझाद- नसीब 1945
10.1937_दुनिया ना माने- शांता आपटे
11.भारत प्यारा देश हमारा- मुस्कुराहट- 1943
12.है धन्य तू भारत नारी- भारत की बेटी- 1936
एल्फिन्स्टन पिक्चर पॅलेस मूव्ही थिएटरचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव, हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण आहे. विशेष उल्लेख करण्याजोगी गोष्ट म्हणजे, कोलकाता येथील एल्फिन्स्टन पिक्चर पॅलेस हा भारतातील पहिला सिनेमा हॉल होता.

प्रदर्शनात तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असून, हे तंत्रज्ञान इथे भेट देणाऱ्यांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर सेल्फी घेण्यासाठी एक AR बूथ, 360 डिग्री रोबोटिक आर्म, तसेच तीन बाजूंची एलईडी भिंत, यासारखी आकर्षण स्थळे या ठिकाणी तयार करण्यात आली आहेत.
संध्याकाळी सिनेमाच्या संकल्पनेवर आधारित दोन लेझर शो आणि प्रोजेक्शन मॅपिंग शो आयोजित केले जातील. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
उद्घाटन समारंभाला ईएसजी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा, आणि पीआयबी, पश्चिम विभागाच्या महासंचालिका मोनिदीपा मुखर्जी देखील उपस्थित होत्या.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/Suvarna/Rajshree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1978598)