माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 0

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर उद्या इफ्फीमध्ये ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ च्या तिसऱ्या आवृत्तीचा भाग म्हणून 48 तासांच्या ‘फिल्म चॅलेंज’ चा करणार प्रारंभ


क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमॉरो : युवा कलाकारांना उद्याचे आघाडीचे चित्रपट निर्माते आणि कलाकार म्हणून स्वतःला घडवण्यासाठी उपलब्ध करून दिलेले एक व्यासपीठ

गोवा/मुंबई, 20 नोव्‍हेंबर 2023

 

संपूर्ण भारतातील 75 सर्जनशील प्रतिभावंत युवक इफ्फी 54 मध्ये  48 तासांत लघुपट बनवण्यासाठी 'फिल्म चॅलेंज' स्वीकारायला सज्ज झाले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह  ठाकूर उद्या (21 नोव्हेंबर, 2023)  '75 क्रिएटिव्ह माइंड्स'चा प्रारंभ करतील.

54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेची तिसरी आवृत्ती सर्जनशील प्रतिभावंत युवकांच्या नवोन्मेष आणि कथा सादरीकरणातील प्रभुत्वाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली आहे.

या अनोख्या उपक्रमामुळे निवडक 75 स्पर्धकांना केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच इफ्फीमध्ये उपस्थित असलेल्या जागतिक चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी देखील ते संवाद साधतील आणि फिल्म बाजार येथे चित्रपट व्यवसायाचे साक्षीदार बनण्याची संधी मिळेल.  "क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो" हा उपक्रम युवकांना चित्रपट निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि उद्याचे आघाडीचे चित्रपट निर्माते आणि कलाकार बनण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

600 हून अधिक अर्जांमधून निवडलेले हे 75 युवा चित्रपट निर्माते आणि कलाकार विविध पार्श्वभूमी असलेले आणि विविध ठिकाणचे आहेत जसे की बिष्णुपूर (मणिपूर), जगतसिंगपूर (ओडिशा), आणि सदरपूर (मध्य प्रदेश) वगैरे. हे स्पर्धक आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या भारतातील 19 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. त्यांची निवड नामवंत व्यक्तींचा समावेश असलेल्या सिलेक्शन ज्युरी आणि ग्रँड ज्युरी पॅनेलद्वारे करण्यात आली आहे.

सहभागींचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असून, विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, स्पर्धेच्या संगीत रचना/ ध्वनी डिझाइन श्रेणीत सहभागी होणारा शाश्वत शुक्ला हा सर्वात तरुण स्पर्धक महाराष्ट्रामधील मुंबईचा आहे, आणि त्याचे वय १८ वर्षे आहे.

सहभागींना चित्रपट निर्मिती संस्था, AVGC कंपन्या आणि स्टुडिओ यासह भारतातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधता यावा यासाठी यावर्षी एक CMOT टॅलेंट कॅम्प देखील आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मोहिमेत सहभागींना आपल्या कल्पना आणि यापूर्वी केलेले काम चित्रपट उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसमोर प्रदर्शित करता येतील.  

 

ग्रँड ज्युरी सदस्य:

श्रेया घोषाल (पार्श्वगायन)

श्रीकर प्रसाद (संपादन)

मनोज जोशी (अभिनय)

वीरा कपूर (वेशभूषा आणि रंगभूषा)

प्रिया सेठ (सिनेमॅटोग्राफी)

सरस्वती वाणी बालगम (अॅनिमेशन, VFX, AR-VR)

सलील कुलकर्णी (संगीत रचना)

उमेश शुक्ला (दिग्दर्शन)

साबू सिरिल (कला दिग्दर्शन)

असीम अरोरा (स्क्रिप्ट रायटिंग)

 

निवड समिती सदस्य:

मनोज सिंग टायगर (अभिनय)

निधी हेगडे (अभिनय)

अभिषेक जैन (दिग्दर्शन)

मनीष शर्मा (दिग्दर्शन) 

चारुदत्त आचार्य (पटकथालेखन)

दीपक किंगराणी (पटकथालेखन)

चारुवी अग्रवाल (अॅनिमेशन, VFX, AR-VR)

दीपक सिंग (अॅनिमेशन, VFX, AR-VR)

नवीन नूली (संपादन)

सुरेश पै (संपादन)

धरम गुलाटी (सिनेमॅटोग्राफी)

सुभ्रांशु दास (सिनेमॅटोग्राफी)

नचिकेत बर्वे (वेशभूषा आणि रंगभूषा)

बिशाख ज्योती (पार्श्वगायन)

अनमोल भावे (संगीत रचना)

सब्यसाची बोस (कला दिग्दर्शन)

10 श्रेणीतील 75 तरुण कलाकारांची यादी इफ्फीच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

https://iffigoa.org/selected-75-creative-minds-2023/en#

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/Sushma/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

iffi reel

(Release ID: 1978386) Visitor Counter : 131


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada