सांस्कृतिक मंत्रालय
कला आणि कारागिरांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक मंत्रालय लाल किल्ल्यावर "इंडिया आर्ट, आर्किटेक्चर डिजाइन महोत्सव " आयोजित करणार
या द्वैवार्षिक कार्यक्रमाचे 8 डिसेंबर रोजी होणार उद्घाटन
आपल्या देशाच्या कलात्मक वारशाच्या समृद्ध चित्रकारीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा द्वैवार्षिक कार्यक्रम एक अभिनव उपक्रम आहे, ज्यामध्ये प्राचीन, आधुनिक, समकालीन आणि तंत्रज्ञानावर आधारित कला, वास्तुकला आहेत : मीनाक्षी लेखी
प्रविष्टि तिथि:
17 NOV 2023 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023
सांस्कृतिक मंत्रालय, लाल किल्ल्यावर इंडिया आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन महोत्सव 2023 चे आयोजन करत असून त्याचे उदघाटन 8 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. उद्घाटन आणि मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर पॅनेल चर्चा, कार्यशाळा आणि कला बाजार सह प्रदर्शनांचे आयोजन 9 तारखेपासून ते 15 डिसेंबर पर्यंत केले जाईल आणि ते जनतेसाठी खुले असेल. आंतरराष्ट्रीय कलाकार, वास्तुविशारद आणि रचनाकार यांची मुख्य भाषणे, सार्वजनिक कला सादरीकरण , कला बाजार आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे या द्वैवार्षिक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे. यानिमित्त उभारलेली दालने 31 मार्च 2024 पर्यंत पहायला मिळतील.
आंतरराष्ट्रीय म्युझियम एक्स्पो आणि फेस्टिव्हल ऑफ लायब्ररी यांसारख्या यशस्वी आयोजनांनंतर , हा कार्यक्रम व्हेनिस, साओ पाउलो आणि दुबई प्रमाणे एक प्रमुख जागतिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे . भारतात पाच सांस्कृतिक ठिकाणे स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील आवाहनाने प्रेरित होऊन, भारतातील वैविध्यपूर्ण कला, वास्तुकला आणि रचना अधोरेखित करणारा आयएएडीबी'23 हा एक अभिनव उपक्रम आहे.
नवी दिल्लीत राष्ट्रीय संग्रहालय येथे आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना, सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, हा महोत्सव पारंपारिक कारागीर, समकालीन डिझायनर, क्युरेटर आणि विचारवंत नेत्यांसह विविधता प्रदर्शित करतो. हा आपल्या देशाच्या कलात्मक वारशाच्या समृद्ध टेपेस्ट्रीचा, उत्सव साजरा करण्यासाठी एक अभिनव उपक्रम आहे, ज्यामध्ये प्राचीन, आधुनिक, समकालीन आणि तंत्रज्ञानावर आधारित कला, वास्तुकला आणि रचना आहेत असे त्या म्हणाल्या.

आठवडाभर चालणारा हा कार्यक्रम दैनंदिन संकल्पनांवर आयोजित केला असून प्रत्येकाचा उद्देश भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे विविध पैलू प्रदर्शित करणे हा आहे.

मंत्रालयाने कलाकार आणि क्युरेटर्सना सोशल मीडियावरील खुल्या आवाहनाद्वारे आयएएडीबी '23 साठी त्यांची कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले होते . मंत्रालयाला 560 विचारणा आणि 260 प्रवेशिका प्राप्त झाल्या त्यापैकी 150 निवडल्या गेल्या आणि त्या कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केल्या जातील.
द इंडिया आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन हा एक अनोखा कार्यक्रम ठरणार आहे ज्याचा उद्देश प्रस्थापित आणि उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ प्रदान करून कलाकार आणि डिझायनर्सच्या समुदायाला एकत्र आणणे हा आहे. कला, वास्तुरचना आणि डिझाइनमधील व्यावसायिकांमध्ये संवाद वाढवून सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगांना बळ देणे हे त्याचे ध्येय आहे.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1977723)
आगंतुक पटल : 157