विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तंत्रज्ञान केंद्रीत वित्तपुरवठ्याद्वारे एमएसएमई उद्योगांना पाठबळ देण्याच्या हेतूने, तंत्रज्ञान विकास मंडळ आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक यांच्यात धोरणात्मक सहकार्य
Posted On:
17 NOV 2023 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023
भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच एमएसएमईना पाठबळ देण्याच्या हेतूने, तंत्रज्ञान विकास मंडळ आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबी यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला असून, या करारान्वये भारतीय किंवा परदेशी तंत्रज्ञानासाठी विकास तसेच व्यवसायिक साधने/उपकरणे निर्माण करण्याच्या क्षेत्रातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा होणे सुलभ होणार आहे.
या सामंजस्य कराराद्वारे, टीडीबी आणि सिडबी यांच्यात कर्जपुरवठ्याच्या बाबत सहकार्य निर्माण झाले आहे. ज्यानुसार, ज्यामध्ये टीडीबी आणि सिडबी, पूर्वी निधी पुरवलेल्या कंपन्यांच्या अतिरिक्त निधीच्या गरजांचा विचार करतील. महत्वाच्या संपर्क साधनांसह दोन्ही संस्था, रेफरल एक्सचेंजसाठी समन्वय निर्माण करतील. टीडीबी आणि सिडबी त्यांच्या संबंधित धोरण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पात्र एमएसएमईंना आर्थिक सहाय्य देखील प्रदान करतील.
दोन्ही संस्थांमधील सहकार्य आर्थिक कक्षेच्या पलीकडे देखील असेल, ज्यानुसार, व्यापक स्तरावर पोहोचण्यासाठी, संयुक्त संपर्क अभियान/ विपणन उपक्रम राबवले जातील. सामंजस्य करारामध्ये नमूद केलेल्या अटींच्या अंमलबजावणीदरम्यान अशी अभियाने किंवा उपक्रम परस्पर सहमतीने राबवले जातील.
टीडीबी आणि सिडबी यांच्यातील ही भागीदारी, एमएसएमई क्षेत्राला पाठबळ देण्याविषयीची कटिबद्धता व्यक्त करणारी असून, त्याद्वारे एकूणच समाजाच्या हितासाठी विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेणाऱ्या एमएसएमई उद्योगांना मदत करण्याची कटिबद्धता व्यक्त करते. या सहकार्यातून नवोन्मेष, रोजगार निर्मिती आणि एमएसएमई क्षेत्राचा एकूण आर्थिक विकासाला चालना मिळू शकेल.
या सहकार्याविषयी, टीडीबीचे सचिव राजेश कुमार पाठक यांनी या भागीदारीबद्दल सकारात्मक भावना आणि उत्साह व्यक्त केला. सिडबीसोबतची ही भागीदारी, तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या मिशनमधील एक अत्यंत महत्वाचा मैलाचा टप्पा आहे. आमच्या दोन्ही संस्थांची ताकद एकत्रित आणून एमएसएमई क्षेत्राला, विशेषतः नवोन्मेष क्षेत्रातील कंपन्यांना, तसेच स्वयंउद्यमशीलता आणि आर्थिक वृद्धीला पोषक उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करण्याचा आमचा उद्देश आहे” असे त्यांनी सांगितले.
N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977692)
Visitor Counter : 125