मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या आशिया आणि प्रशांत क्षेत्र प्रादेशिक आयोगाची 33 वी परिषद संपन्न


केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांचे समापन समारंभात भाषण

प्रविष्टि तिथि: 16 NOV 2023 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2023

भारतात 13 ते 16 नोव्हेंबर 2023 दरम्यान जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या आशिया आणि प्रशांत  क्षेत्र प्रादेशिक आयोगाच्या 33 व्या परिषदेचे  आयोजन केले गेले होते. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामार्फत या चार दिवसीय परिषदेचे आयोजन नवी दिल्लीत केले गेले होते.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री  परशोत्तम रुपाला यांनी आज या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. रुपाला यांनी आपल्या  भाषणात, भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये प्राणी कल्याणाचे खोलवर असलेले महत्त्व अधोरेखित केले.   "वसुधैव कुटुंबकम" या संकल्पनेअंतर्गत सगळे जग एक कुटुंब आहे.तसेच मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्यातील सुसंवादी सहअस्तित्व आणि परस्परसंबंधाचे महत्त्व या संकल्पनेत  अधोरेखित होते,असेही त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय मे 2023 मध्ये पॅरिस येथे  जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींच्या जागतिक बैठकीच्या 90 व्या सर्वसाधारण सत्रादरम्यान घेण्यात आला होता. 13 नोव्हेंबर 2023 रोजी उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री डॉक्टर संजीव बालियान यांनी भूषविले होते. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन  आणि अन्य मान्यवर हे सुद्धा या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

 

S.Kakade/G.Deoda/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1977506) आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Telugu