संरक्षण मंत्रालय

जकार्ता येथे 10 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक 'एडीएमएम -प्लस' निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या इंडोनेशियन आणि व्हिएतनामी समकक्षांसोबत द्विपक्षीय बैठका

Posted On: 16 NOV 2023 8:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2023

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी 16 नोव्हेंबर 2023 रोजी जकार्ता, इंडोनेशिया येथे 10 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांची  बैठक, (एडीएमएम -प्लस  )  निमित्ताने  त्यांच्या इंडोनेशियन आणि व्हिएतनामी समकक्षांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री   प्रबोवो सुबियांतो यांच्या भेटीदरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी  इंडोनेशियाच्या या वर्षीच्या आसियानचे   नेतृत्व आणि एडीएमएम-प्लसच्या   उत्कृष्ट आयोजनाची  प्रशंसा केली. उभय  मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंधांचा आढावा घेतला आणि विशेषत: सागरी क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा वचनबद्धता दर्शवली.

राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान वान  गियांग यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही मंत्र्यांनी जून 2022 मध्ये भारताच्या संरक्षण मंत्र्यांच्या व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी केलेल्या ‘भारत-व्हिएतनाम संरक्षण सहकार्य  2030 च्या दिशेने संयुक्त दृष्टिपत्राच्या ’  अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला.  प्रशिक्षण, क्षमता बांधणी, संरक्षण उद्योग सहकार्य, संयुक्त राष्ट्र शांतता कार्य, द्विपक्षीय जहाज भेटी आणि सराव अशा विस्तृत कार्यक्षेत्रातील  बहुआयामी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने  एकत्र काम करण्यासाठी उभय नेत्यांनी  वचनबद्धता दर्शवली.  संरक्षणमंत्र्यांनी  10 व्या एडीएमएम -प्लसच्या निमित्ताने  आसियानचे सरचिटणीस  डॉ काओ किम हॉर्न यांचीही भेट घेतली.

 

S.Kakade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1977501) Visitor Counter : 67


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi