वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

ऑक्टोबर 2023 मध्ये भारताची एकंदर निर्यात 62.26 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज, ऑक्टोबर 2022 च्या 56.90 अब्ज डॉलरच्या तुलनेत 9.43 टक्के वाढ


एप्रिल ते ऑक्टोबर 2022 च्या कालावधीतील 89.96 अब्ज डॉलर व्यापारी तुटीच्या तुलनेत 2023 मध्ये व्यापारी तूट 57.64 अब्ज डॉलर, व्यापारी तुटीमध्ये 35.86 टक्के घट

Posted On: 15 NOV 2023 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2023

ऑक्टोबर 2023* मध्ये भारताची एकंदर निर्यात( व्यापारी माल आणि सेवा एकत्रित) 62.26 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज असून त्यामुळे ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत 9.43 टक्के सकारात्मक वाढीची नोंद झाली आहे. ऑक्टोबर 2023* मध्ये भारताची एकंदर आयात 79.35 अब्ज डॉलर राहण्याचा अंदाज आहे.

table 1

 

October 2023

(USD Billion)

October 2022

(USD Billion)

Merchandise

Exports

33.57

31.60

Imports

65.03

57.91

Services*

Exports

28.70

25.30

Imports

14.32

13.51

Overall Trade

(Merchandise +Services) *

Exports

62.26

56.90

Imports

79.35

71.42

Trade Balance

-17.08

-14.52

ऑक्टोबर 2023 मध्ये व्यापारी निर्यात 33.57 अब्ज डॉलर होती तर ऑक्टोबर 2022 मध्ये ही निर्यात 31.60 अब्ज डॉलर होती.

ऑक्टोबर 2023 मध्ये व्यापारी मालाची आयात 65.03 अब्ज डॉलर होती तर ऑक्टोबर 2022 मध्ये ही आयात 57.91 अब्ज डॉलर होती. 

एप्रिल ते ऑक्टोबर 2023 मध्ये व्यापारी मालाची व्यापारी तूट एप्रिल ते ऑक्टोबर 2022 मधील 167.14 अब्ज डॉलरच्या तुलनेत 147.07 अब्ज डॉलर राहण्याचा अंदाज आहे.

बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने आणि आभूषणांची ऑक्टोबर 2023 मधील निर्यात ऑक्टोबर 2022 मधील 21.99  अब्ज डॉलर च्या तुलनेत 24.57 अब्ज डॉलर होती.

बिगर पेट्रोलियम, बिगर रत्ने आणि आभूषणे(सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) यांची ऑक्टोबर 2023 मधील आयात ऑक्टोबर 2022 मधील 35.12 अब्ज डॉलरच्या तुलनेत 36.87 अब्ज डॉलर होती.

सेवा व्यापार

सेवांच्या निर्यातीचे अंदाजित मूल्य ऑक्टोबर 2023* मध्ये ऑक्टोबर 2022 मधील 25.30 अब्ज डॉलरच्या तुलनेत 28.70 अब्ज डॉलर आहे.

सेवांच्या आयातीचे अंदाजित मूल्य ऑक्टोबर 2023* मध्ये ऑक्टोबर 2022 मधील 13.51 अब्ज डॉलरच्या तुलनेत 14.32 अब्ज डॉलर आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर 2023 मधील सेवा निर्यात 6.22 टक्के सकारात्मक वृद्धीची नोंद करण्याचा अंदाज आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये निर्यातवृद्धीत मुख्य योगदान देणाऱ्या घटकांमध्ये औषधे आणि फार्मा उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कापसाचे सूत/ वस्त्र/ हातमाग उत्पादने इ, लोहखनिज, सेरॅमिक उत्पादने आणि काचेच्या वस्तू आणि मांस, दुग्धोत्पादन आणि पोल्ट्री उत्पादनांचा समावेश आहे.

औषधे आणि फार्मा उत्पादनांच्या निर्यातीत ऑक्टोबर 2022 च्या 1.87 अब्ज डॉलरच्या तुलनेत ऑक्टोबर 2023 मध्ये 2.42 अब्ज डॉलर इतकी 29.31 टक्क्यांची वाढ झाली.

अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत ऑक्टोबर 2022 च्या 7.55 अब्ज डॉलरच्या तुलनेत ऑक्टोबर 2023 मध्ये 8.09 अब्ज डॉलर इतकी 7.2 टक्क्यांची वाढ झाली.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत ऑक्टोबर 2022 च्या 1.85 अब्ज डॉलरच्या तुलनेत ऑक्टोबर 2023 मध्ये 2.38 अब्ज डॉलर इतकी 28.23 टक्क्यांची वाढ झाली.

कृषी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये वाढ पुढीलप्रमाणे : तृणधान्य उत्पादने आणि विविध प्रक्रियाकृत उत्पादने (40.95%), तेलबिया (29.7%), फळे आणि भाजीपाला(24.48%), ऑईल मील्स (17.32%), मसाले (10.78%), कॉफी (8.45%), चहा (4.12%), काजू (3.29%).

भारताच्या व्यापारी तुटीमध्ये एप्रिल ते ऑक्टोबर 2023 दरम्यान लक्षणीय घट दिसून आली. एप्रिल ते ऑक्टोबर 2023* दरम्यान एकंदर व्यापारी तूट एप्रिल ते ऑक्टोबर 2022 मधील 89.86 अब्ज डॉलरच्या तुलनेत  57.64 अब्ज डॉलर राहिली आणि ही घट (-) 35.86 टक्के होती. एप्रिल ते ऑक्टोबर 2023 मध्ये व्यापारी मालाची व्यापार तूट एप्रिल ते ऑक्टोबर 2022 मधील 167.14 अब्ज डॉलरच्या तुलनेत 147.07 अब्ज डॉलर राहिली, ज्यामुळे ही घट (-) 12.01 टक्के होती. 

*जलद अंदाजांसाठी लिंक

 S.Kakade/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1977224) Visitor Counter : 321


Read this release in: Bengali , English , Urdu , Hindi