पंतप्रधान कार्यालय
झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी झारखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 NOV 2023 9:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या जनतेला झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
श्री मोदी म्हणाले, की झारखंड हे आपल्या खनिज संपत्तीसाठी तसेच आदिवासी समाजाच्या धैर्य, शौर्य आणि स्वाभिमानासाठी प्रसिद्ध आहे. झारखंडच्या जनतेने देशाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
आपल्या X या समाज माध्यमावरील
पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“झारखंड आपल्या खनिज संपदेसह येथील आदिवासी समाजाचे, शौर्य आणि स्वाभिमानासाठी यासाठी सुप्रसिद्ध आहे. येथे रहाणाऱ्या माझ्या बांधवांनी देशाच्या प्रगतीसाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे. झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो, त्याचबरोबर या राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभचिंतन करतो.
***
JPS/Sampada/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1977022)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam