विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

संसदेतील प्रश्न, संसदेचे कायदे आणि भारत सरकारच्या राजपत्र अधिसूचना तसेच मंत्रिमंडळाच्या सूचना यासह संसदेच्या वास्तविक, त्वरित आणि प्रभावी कामकाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन "डॅशबोर्ड" पोर्टल, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केले सुरु

Posted On: 14 NOV 2023 6:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2023

संसदेतील प्रश्न, संसदेचे कायदे आणि भारत सरकारच्या राजपत्र अधिसूचना तसेच मंत्रिमंडळाच्या सूचना यासह संसदेच्या वास्तविक, त्वरित आणि प्रभावी कामकाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन "डॅशबोर्ड" पोर्टल, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज सुरू केले.

तत्पूर्वी, त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) मुख्यालय असलेल्या 'तंत्रज्ञान भवन' च्या आवारात नवीन सभागृह-अतिथीगृह संकुलाची पायाभरणी केली. त्यांनी त्या ठिकाणी फलकाचे अनावरण केले आणि भूमीपूजनातही भाग घेतला.

तंत्रज्ञान भवन संकुलात दुमजली तळघर वाहनतळासह  (9000 चौरस मीटर) नवीन 500 आसनक्षमता असलेले अत्याधुनिक सभागृह (5000 चौरस मीटर) बांधले जात आहे. सभागृह 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. इरकॉन आयएसएल हे या प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहेत.

संसदेतील प्रश्न, मंत्रिमंडळ सूचना, संसदेचे कायदे आणि डीएसटीशी संबंधित भारत सरकारच्या राजपत्र अधिसूचना यासाठी डीएसटीच्या सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन पोर्टलचेही उद्घाटन याप्रसंगी, डॉ. जितेंद्र सिंग यांनी केले.

नवीन पोर्टलने डीएसटीच्या सर्व उपक्रमांसाठी डॅशबोर्ड म्हणून काम केले पाहिजे असे डॅशबोर्ड या सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनचा शुभारंभ करताना डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले. डी. एस. टी. अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) संचालित तंत्रज्ञानाचा वापर करून सदस्यांच्या प्रोफाइलसह विविध मापदंडांवर संसदेच्या प्रश्नांचे विश्लेषण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गांबद्दल शास्त्रज्ञ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. एकट्या डी. एस. टी. ने देशातील सुमारे 12,000 किंवा एक लाखाहून अधिक स्टार्टअप्सना निधी पुरवला आहे याबद्दल डॉ. जितेंद्र सिंग यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

G.Chippalkatti/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976944) Visitor Counter : 69


Read this release in: English , Urdu , Hindi